को.रे.ला ग्राहक मंचचा दणका
By admin | Published: July 1, 2014 02:07 AM2014-07-01T02:07:50+5:302014-07-01T02:07:50+5:30
जागा आरक्षित केली असतानाही आरक्षित डब्यात बिगर आरक्षित प्रवाशांचे लोंढे आल्याने वास्को ते नाशिकर्पयतचा प्रवास मोठय़ा मुश्कीलीने करावा
>मडगाव : जागा आरक्षित केली असतानाही आरक्षित डब्यात बिगर आरक्षित प्रवाशांचे लोंढे आल्याने वास्को ते नाशिकर्पयतचा प्रवास मोठय़ा मुश्कीलीने करावा लागलेल्या चिखली वास्को येथील सुरेश कामत या 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने त्यांना सोसाव्या लागलेल्या प्रवासासाठी व झालेल्या मनस्तापासाठी कोकण रेल्वेने 6 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी व दाव्याची रक्कम म्हणून आणखी दोन हजार रुपये देण्याचा आदेश राज्य ग्राहक मंचचे अध्यक्ष नेल्सन ब्रिटो व विद्या गुरव यांनी दिला.
नोव्हेंबर 2012 मध्ये वास्कोहून नाशिकला जाणा:या सुरेश कामत व त्यांच्या पत्नीला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. वास्को-पाटणा एक्स्प्रेसच्या स्लीपर क्लासची दोन तिकिटे त्यानी आरक्षित केली होती. रेल्वे मडगावात आल्यावर बिनआरक्षित प्रवासी गाडीत चढल़े गर्दीमुळे नाशिकला पोहचेर्पयत सुरेश कामत टॉयलेटलाही जाऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्याबाबत कामत यांनी दक्षिण गोवा ग्राहक मंचसमोर आपला दावा दाखल करुन रेल्वे बोर्डाला प्रतिवादी करुन तिकीटाचे पैसे, जेवणाचा खर्च तसेच इतर प्रवासाचा खर्च असे एकंदर 6 हजार 331 रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली़ दक्षिण गोवा मंचचे अध्यक्ष जयंत प्रभू व त्यांच्या मंडळाने ही मागणी मान्य करताना कामत यांना ही रक्कम देण्याबरोबरच दाव्याचा खर्च म्हणून आणखी दहा हजार रुपये दय़ावेत असा आदेश दिला होता. या आदेशाला कोंकण रेल्वेतर्फे राज्य आयोगासमोर आव्हान देण्यात आले होते.
आयोगाने त्यांच्या आदेशात कामत यांना 6 हजारची नुकसान भरपाई व दोन हजार रुपये दाव्याच्या खर्चापोटी देण्यास सांगितले आह़े 3क् दिवसात ही रक्कम दिली नाही तर त्यावर 9 टक्के व्याज द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. आवश्यक वाटल्याल कोंकण रेल्वेने ही रक्कम कामात हलगर्जीपणा दाखविलेल्या टीसीकडून वसूल करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)