वाड्यात रंगल्या झुंजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2016 03:00 AM2016-11-03T03:00:15+5:302016-11-03T03:00:15+5:30
रेड्यांच्या झुंजीत साईनाथ काटोळे वाफाळे ता. भिवंडी व माधव पष्टे निचोळे ता. वाडा यांच्या रेड्यांमध्ये अंतिंम झुंज होऊन त्यात काटोळे यांचा रेडा प्रथम आला.
वाडा : या तालुक्यातील मांगाठणे येथील गांवदेवी मित्र मंडळाने आयोजिलेल्या रेड्यांच्या झुंजीत साईनाथ काटोळे वाफाळे ता. भिवंडी व माधव पष्टे निचोळे ता. वाडा यांच्या रेड्यांमध्ये अंतिंम झुंज होऊन त्यात काटोळे यांचा रेडा प्रथम आला. पष्टे यांच्या रेड्याचा दुसरा क्रमांक आला. रेड्यांच्या झुंजी पाहण्यासाठी पालघर, ठाणे जिल्हयातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. २५ ते ३० वर्षापासून या झुंजी होत आहेत. डोळयांचे पारणे फिटावे अशा या झुंजी झाल्या. एकूण ३० रेड्यांनी या झुंजीत भाग घेतला होता. काँग्रेसचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष इरफान सुसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बारकू घोडविंदे घोडविंदे पाडा व संजय विशे दिनकरपाडा यांच्या रेड्यांमध्ये उद्घाटनाची झुंज लावण्यात आली
प्रेक्षकांना कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी संपूर्ण मैदानाला काटेरी कुंपण करण्यात आले होते. हे सामने पाहण्यासाठी रिपब्लीकन जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष रमेश भोईर, नैशिब भूरे, आशुबा मोहीते, नशिर सुसे, अशोक पाटील आदि उपस्थित होते. यावेळी बारकू घोडविंदे, संतोष गोळे, विजय पाटील, अजित पाटील, कुमार पाटील, संजय विशे यांच्या रेड्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभास कुणबी सेनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष कांती म्हसकर, वाडा तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष कुमार पाटील, शिवसेनेचे हेमंत भोईर, नरेश जाधव आदि उपस्थित होते. पाटील, हेमंत पाटील व मित्रमंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)