बिंग फुटले : फरार आरोपी पोलिसांच्या कोठडीत

By admin | Published: July 7, 2016 10:08 PM2016-07-07T22:08:12+5:302016-07-07T22:08:12+5:30

बनावट कागदपत्रांच्या आधारे कोराडीच्या औष्णीक विद्यूत केंद्रात नोकरी मिळवणा-या दोन आरोपींचे बींग फुटल्याने ते फरार झाले

Bung Futley: In absconding police custody | बिंग फुटले : फरार आरोपी पोलिसांच्या कोठडीत

बिंग फुटले : फरार आरोपी पोलिसांच्या कोठडीत

Next

ऑलाइन लोकमत
नागपूर, दि. ७ : बनावट कागदपत्रांच्या आधारे कोराडीच्या औष्णीक विद्यूत केंद्रात नोकरी मिळवणा-या दोन आरोपींचे बींग फुटल्याने ते फरार झाले. त्यानंतर तब्बल ५ वर्षानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. गौतम भगवान नगरारे (रा. करुणा गौतमबुद्ध विहार जवळ गोरेवाडा) आणि महेंद्र नामदेव सोनटक्के (रा. नांदा कोराडी) अशी आरोपींची नावे असून, नोकरीच्या लालसेपोटी बनवाबनवी केल्याने या दोघांना आता पोलिसांच्या कोठडीत जावे लागले आहे.

पाच वर्षांपूर्वी कोराडी औष्णीक विद्यूत केंद्रात कारागिर (क) पदासाठी नोकरभरती करण्यात आली. हे पद आयटीआय प्रशिक्षीत प्रकल्पग्रस्त बेरोजगारांसाठी आरक्षीत होते. आरोपी नगरारे आणि सोनटक्के यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे १६ जुलै २०११ ला प्रकल्पात नोकरी मिळवली. दरम्यान, प्रकल्पाधिका-यांनी उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी संबंधित विभागाकडून शहानिशा केली तेव्हा या दोघांनी आयटीआय तसेच प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र जोडल्याचे उघडकीस आले.

त्यामुळे मुख्य अभियंत्यांतर्फे शरद बाबूराव पंचभाई यांनी कोराडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला. त्याची माहिती कळताच आरोपी फरार झाले. त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी ५ जुलैला नगरारे त्याच्या घराजवळ आढळला. तर, ६ जुलैला सदर सोनटक्के नांदा बसस्थानकाजवळ आढळला. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली

Web Title: Bung Futley: In absconding police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.