‘प्रोजेक्ट’चे ओझे पालकांना डोईजड

By admin | Published: June 28, 2016 03:03 AM2016-06-28T03:03:12+5:302016-06-28T03:03:12+5:30

पुठ्ठ्याचे घर, मातीच्या पाच वस्तू, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवून आणणे, अशा सूचना पाल्याच्या नोंदवहीत दिसल्या की, पालक कंबर कसून प्रोजेक्ट बनवण्याच्या तयारीला लागतात.

The burden of 'project' parents drooled | ‘प्रोजेक्ट’चे ओझे पालकांना डोईजड

‘प्रोजेक्ट’चे ओझे पालकांना डोईजड

Next

लीनल गावडे,

मुंबई- पुठ्ठ्याचे घर, मातीच्या पाच वस्तू, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवून आणणे, अशा सूचना पाल्याच्या नोंदवहीत दिसल्या की, पालक कंबर कसून प्रोजेक्ट बनवण्याच्या तयारीला लागतात. विद्यार्थ्यांसाठी दिलेला प्रोजेक्ट पालक मुलांच्या मदतीशिवाय वेळेवर बनवून देण्याचा मागेच लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाच्या नावाखाली बनवून घेतल्या जाणाऱ्या प्रोजेक्टस्चा फायदा मुलांना किती होतो, हा प्रश्नच आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके पालक सोडता, प्रकल्पाचा बागुलबुवा पालक आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रासदायक ठरतो, हे मात्र नक्की.
विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, म्हणून पालक अगदी कोवळ्या वयातच मुलांना नर्सरीमध्ये घालतात. खरे तर त्या मागे त्यांना शाळेत रुळता यावे, इतकाच हेतू असतो, पण शाळेत पहिले पाऊल ठेवायच्या आत विद्यार्थ्यांना अ, आ, इ, ई मुळाक्षरांशी ओळख करून देण्याऐवजी ‘प्रोजेक्टस’चा तगादा लावला जातो.
खरे तर कोणत्याही शासकीय नियमांनुसार, विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीपर्यंत प्रकल्प(प्रोजेक्ट) करणे अनिवार्य नसते. त्यातल्या त्यात नर्सरीपासून ३ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तर मुळीच नाही. आरटीआई अंतर्गत विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील शोधक वृत्ती वाढावी, यासाठी विद्यार्थ्यांकडून काही करून घेणे अनिवार्य आहे, पण त्यात प्रोजेक्टस्चा समावेश होत नाही, तर
>नापास करण्याची भीती
मूल नापास होऊ नये, या भीतीने पालक मुलांना नर्सरी, शाळेत सांगितलेला प्र्रकल्प बनवून देतात. विद्यार्थ्यांचा त्या प्रकल्पाशी काडीमात्र संबंध नसतो, पण आपल्या मुलाच्या प्रोजेक्टला आणि सुंदर, छान शेरा मिळावा, म्हणून पालकच मुलांना तो बनवून देतात.पालकांची चढाओढ
प्रोजेक्ट चांगलाच झाला पाहिजे, अशी एक मानसिकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये तयार होते आणि मग पालकांचीही चढाओढ सुरू होते. पालक आपल्या कलेनुसार प्रकल्प बनवतात.विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसराची माहिती व्हावी, यासाठी झाडांची ओळख, मातीचा स्पर्श, रंग ज्ञान, या साऱ्या गोष्टींचे ज्ञान देणे अपेक्षित असते, पण विद्यार्थ्यांना मूल्याकंन देणे सोपे जावे, म्हणून अनेक शाळा थेट प्रोजेक्टस्च विद्यार्थ्यांकडून करवून घेतात. विशेष म्हणजे, अनेक शाळा पालकांकडून नापास करण्याची भीती दाखवून करवून घेतात. ज्या वयात शी-शू करण्यासाठीही विद्यार्थ्यांना पालकांची मदत लागते, त्या वयात मूल प्रोजेक्ट तो काय करणार? अनेक शाळांमध्ये प्रकल्पांची यादीच तयार असते. नर्सरीत मुलाने प्रवेश घेतल्यानंतर त्याला वर्षभर काय बनवून आणावे लागणार, याची भली मोठी यादीच पालकांकडे देण्यात येते. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत सहा तास बसण्यासाठीची मानसिकता तयार करण्याआधीच, प्रोजेक्ट नावाचा ताण त्यांच्या खांद्यावर टाकला जातो. याचा आर्थिक आणि मानसिक ताण विद्यार्थी-पालक दोहोंवर होतो.
>शाळांच्या प्रकल्पांपेक्षा पालकांची बदलत जाणारी मानसिक स्थिती घातक झाली आहे. स्वत: प्रकल्प बनवून देण्याची सवय लावल्यामुळे विद्यार्थ्यांमधील विचारशक्ती दिवसेंदिवस कमकुवत होऊ लागली आहे. आयतेपणाची सवय लागल्यामुळे मुलांना सगळ््याच गोष्टी पैशाने मिळू शकतात, हे कळून चुकले आहे. याचा त्रास त्यांनी वयाच्या १७ ते १८व्या वर्षी जरूर होईल. मेहनत करण्याची सवय नसल्यामुळे काही नवे करण्याची शिकण्याची मनिषा नष्ट होईल. त्यामुळे पालकांनी स्वत:ला आताच सावरायला हवे, तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल.
- डॉ. समीर दलवाई, मुलांचे व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ
प्रकल्पाची सक्ती पाचवीपर्यंत नाहीच. आरटीआयनुसार विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमतेला चालना मिळावी, यासाठी प्रोजेक्टस् राबवण्याची मुभा आहे, पण त्याची सक्ती नाही. विद्यार्थ्यांकडून अगदी त्यांना जमेल असा प्रोजेक्ट करून घेणे अपेक्षित असते. प्रोजेक्टमागचा उद्देश पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करण्याचा असतो. त्यात मुलांचा सहभाग अपेक्षित असतो, पण प्रत्यक्षात तसे होत नाही. पालक प्रोजेक्टमध्ये स्वत:ला गुंतवून घेतात, ते करू नका.
- प्रशांत रेडीज, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृति समिती
प्रोजेक्टचा बाजार
नोकरी करणाऱ्या पालकांना प्रोजेक्ट बनवायला वेळ काढणे फारच कठीण असते. नोकरी करणाऱ्या पालकांची गरज ओळखून अनेक दुकाने ‘रेडिमेड प्रोजेक्ट’स् दुकाने थाटतात. अगदी ५०० ते ५ हजार रुपयांच्या आत प्रोजेक्ट मिळतात. विशेष म्हणजे, शाळा परिसरातच असणाऱ्या दुकानांमध्ये वर्षभर लागणाऱ्या प्रोजेक्टस्ची सारी सामग्री उपलब्ध असते.

Web Title: The burden of 'project' parents drooled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.