जिल्हा रूग्णालयांवरच ‘स्वाईन’चा भार

By admin | Published: March 11, 2015 01:36 AM2015-03-11T01:36:29+5:302015-03-11T01:36:29+5:30

औरंगाबाद, लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात स्वाईन फ्लूने दहशत निर्माण केली असून आतापर्यंत ३० जणांचा बळी घेतला आहे

The burden of 'swine' on district hospitals only | जिल्हा रूग्णालयांवरच ‘स्वाईन’चा भार

जिल्हा रूग्णालयांवरच ‘स्वाईन’चा भार

Next

औरंगाबाद : औरंगाबाद, लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात स्वाईन फ्लूने दहशत निर्माण केली असून आतापर्यंत ३० जणांचा बळी घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य केंद्रे उघडण्यात आली असली तरी पुरेशा सुविधांअभावी औरंगाबाद जिल्ह्याचा भार ‘घाटी’वर तर इतर ठिकाणी जिल्हा रूग्णांवरच ताण पडला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लूने जानेवारीपासून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ४६ पेक्षा जास्त लोकांना या आजाराची लागण झाल्याचे तपासणी अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये व महापालिका केंद्रात केवळ प्राथमिक तपासणीचेच काम होत आहे. ग्रामीण भागातील एकाही शासकीय रुग्णालयात किंवा मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करुन त्यांच्यावर उपचाराची सोय उपलब्ध नाही.
घाटी रुग्णालयातील स्वाईन फ्लूच्या वार्डात सध्या १४ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघे पॉझिटिव्ह असून उर्वरित रुग्णांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. एम. गायकवाड यांनी तीन उपजिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र वार्ड केल्याचे सांगितले.
‘स्वाईन फ्लू’ने एकट्या लातूर जिल्ह्यात १३ बळी गेले आहेत. जिल्ह्यात संशयित म्हणून दाखल झालेल्या २२१ पैकी १७९ जणांचे स्वॅब पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ व्हायरालॉजी’ला पाठविण्यात आले होते. त्यातील ४९ जणांना ‘स्वाईन’ झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अद्यापतही तिघे व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षात २२ संशयितांवर उपचार सुरू आहेत. तिघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व रुग्ण जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात येत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील चार महिलांचा मृत्यू झाला आहे़ महिनाभरात ३० जणांनी जिल्हा रूग्णालयात उपचार घेतले आहेत़ सध्या जिल्हा रूग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रूग्णालयासह तुळजापूर, उमरगा व परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे़
बीडमध्ये एक रुग्ण दगावला आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूची दहशत आहे. १२ फेबु्रवारीला पहिला रुग्ण आढळल्यानंतर १८ फेब्रुवारीपर्यंत ही संख्या सातपर्यंत वाढत गेली. आतापर्यंत सुमारे ५३ जणांचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यापैकी १४ नमुने पॉझिटिव्ह तर चार नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. (प्रतिनिधी)

Web Title: The burden of 'swine' on district hospitals only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.