रिधोराजवळ बर्निंग बसचा थरार!
By admin | Published: April 17, 2017 10:45 PM2017-04-17T22:45:13+5:302017-04-17T22:59:03+5:30
व्याळा- धावत्या बसला आग लागल्याने प्रवाशांनी रिधोराजवळ बर्निंग बसचा थरार अनुभवला. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने ३८ प्रवाशांचे प्राण वाचले.
Next
ऑनलाइन लोकमत
चालकाच्या सतर्कतेने प्राणहानी टळली
व्याळा: धावत्या बसला आग लागल्याने प्रवाशांनी रिधोराजवळ बर्निंग बसचा थरार अनुभवला. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने ३८ प्रवाशांचे प्राण वाचले.
खामगाववरून बस क्र.एमएच २० बीएल १८३२ अकोल्याकडे येत होती. रिधोरा ते व्याळादरम्यान पेट्रोलपंपाजवळ गाडीच्या इंजीनने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण बस खाक झाली. बस चालक सुरेश एकनाथ इंगळे यांच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने त्यांनी सर्व प्रवाशांना बसखाली उतरवले. चालकाच्या सतर्कने ३८ प्रवाशांचे प्राण वाचले.