बसअभावी प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:10 PM2018-08-28T23:10:27+5:302018-08-28T23:10:42+5:30
निमसाखर (ता. इंदापूर) येथील निमसाखर, घोरपडवाडी, सराफवाडी, तसेच चौपन्न फाटा येथुन इंदापूर येथे जाण्यासाठी एक हि बस नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
निमसाखर : निमसाखर (ता. इंदापूर) येथील निमसाखर, घोरपडवाडी, सराफवाडी, तसेच चौपन्न फाटा येथुन इंदापूर येथे जाण्यासाठी एक हि बस नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. इंदापूर तालुक्यातील कुरवली, कळंब, निमसाखर मार्गे इंदापूरला जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग आहे. पूर्वी इंदापूर-पुणे काटी, सराफवाडी, घोरपडवाडी मार्गे बस सेवा सुरू होती. मात्र काही महिन्यांपासून हि बस हि बंद आहे. या भागातुन सध्या एक हि बस नसल्याने विद्यार्थी, वृध्द, आजारी रुग्णांसह या भागातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
सराफवाडी घोरपडवाडी जाधवमळा बोंन्द्रेवस्ती या भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी निमसाखर, वालचंदनगर, कळंब, भवानीनगर, बारामती भागात जात आहेत. मात्र सध्या या ठिकाण बसची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना निमसाखर, चौपन्न फाटा, अथवा निमगाव-केतकी या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती पायपीट किंवा सायकलवर वरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे एस.टी.प्रशासनाने या गोष्टीची लवकरात लवकर दखल घेऊन या भागातुन बस सुरू करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.