बस आणि कारचा अपघात, 6 प्रवाशी जखमी

By Admin | Published: January 19, 2017 08:50 PM2017-01-19T20:50:57+5:302017-01-19T20:50:57+5:30

भरधाव वेगाने जाणारी एसटीबस व कार समोरा समोर धडकली या अपघातात कारमधील 6 प्रवाशी जखमी

Bus and car accident, 6 passengers injured | बस आणि कारचा अपघात, 6 प्रवाशी जखमी

बस आणि कारचा अपघात, 6 प्रवाशी जखमी

googlenewsNext

ir="ltr">ऑनलाइन लोकमत

सिल्लोड, दि.19 - सिल्लोड जवळ संभाजी राजे चौक़ातील वळणावर जळगाव औरंगाबाद रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारी एसटीबस व कार समोरा समोर धडकली या अपघातात कारमधील 6 प्रवाशी जखमी झाले असून कारमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारी 3 वाजता झाला.
या अपघातात कार चालक व मालक माधव रामराव गुटे वय 50 , पत्नी ललीता माधवराव गुटे वय 45 दोघे रा औरंगाबाद  यांची प्रकृति चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
या अपघातात  जखमी झालेल्या प्रवाश्या ची नावे अशी कृष्ना माधवराव गुटे वय 18, प्राजक्ता माधवराव गुटे वय 20, रश्मि माधवराव गुटे वय 28,व सुजिता माधवराव गुटे सर्व रा.जयभारती नगर औरंगाबाद अशी आहे.

औरंगाबाद येथील रहिवाशी असलेले गुटे पारिवार हे सैलानी येथे दर्शन घेऊन  औरंगाबाद कडे जात असतांना सिल्लोड शहरा जवळ  त्यांच्या टाटा विस्टा कार क्र. एम एच 20 सीएस 7312 ला भरधाव वेगाने येणाऱ्या सिल्लोड आगाराची एसटी बस क्र.एमएच 12 एक्यू 8812 ने  जोराची धडक दिल्याने कार मधील 6 प्रवाशी जखमी झाले.एकाच परिवारातील सहा जन जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कांतिलाल पाटिल,सपोनी शकील शेख,पो. ना. टारपे,पो.कॉ. कोरडे हे घटनास्थळी दाखल झाले.व अपघातातील जखमींना उपचारासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.जखमींना प्राथमिक उपचार करुण घरी पाठविण्यात आले.पुढील तपास हे पोलिस निरीक्षक कांतिलाल पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शकील शेख हे करीत आहे.

कारचा चक्काचुर.......
सदरील अपघात एवढा भयंकर होता की कारचा चक्काचुर झाला सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही. बस मधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

धोकादायक वळण........
राजे संभाजी चौक हे सिल्लोड बायपास रस्त्यावर असून येथे धोकादायक वळण आहे. वसि या वळणावरच  हा अपघात झाला. सिल्लोड शहरात जाणारा रस्ता व हायवे यात वाहन चालकांना रस्ताच कळत नाही या वळणावर रेडियम, दिशादर्शक फलक,  नाही यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होतात याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

आठ दिवसात तीसरा अपघात
एसटी महामंडल बसचा एका आठवडयातील हा तीसरा अपघात असून या तिन्ही अपघातात आता पर्यन्त 25 प्रवाशी जखमी झाले आहे. मागील आठवड्यात शहराजवळील म्हशांनभुमी जवळ ट्रक बस अपघातात तीन जन जखमी झाले होते. तर दुसरा अपघात हा शहरातील आझाद चौक येथे बस ट्रक वर जाऊन धड़कल्याने यात तब्बल सोळा जन जखमी  झाले होते.  व गुरुवार झालेल्या बस - कार अपघातात कार मधील सहा जण जखमी झाले .(फोटो)

Web Title: Bus and car accident, 6 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.