बसचे अपहरण; तिघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 05:35 AM2016-08-23T05:35:30+5:302016-08-23T05:35:30+5:30

खासगी बसचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी २९ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.

Bus hijacking; Three closet | बसचे अपहरण; तिघांना कोठडी

बसचे अपहरण; तिघांना कोठडी

Next


सोलापूर/नागपूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत खासगी बसचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी २९ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. विशाल माणिक गोडसे, प्रवीण गुंड, स्वप्नील माने (तिघेही राहणार धोत्री. जि. उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत.
रविवारी दुपारी तीन वाजता कोल्हापूरहून नागपूरसाठी रवाना झालेली खासगी बस (एम.एच. ४० ए.टी.०१८७) रात्री हगलूरजवळील हॉटेल अशोका येथे जेवणासाठी थांबली होती. तेथून मार्गस्थ झाल्यावर चालक शेख महमंद निजाम यास पाठीमागून गाडीच्या काचेवर कोणीतरी दगड मारल्याचे लक्षात आल्यामुळे त्याने उळे गावाजवळ बस थांबवून तो खाली उतरला. याचवेळी आरोपी विशाल माणिक गोडसे हा बसमध्ये चढला, समोरची काच फोडली आणि बसचा ताबा घेऊन ती कासेगावकडे नेली. संशय आल्याने गावातील काही लोकांनी बस थांबवून आरोपीला पकडून ठेवले. यामध्ये बसचे ५० हजारांचे नुकसान केल्याचे सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात चालकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या बसमधील नागपुरचे ३० प्रवासी सुखरूप परतले आहेत. अपहरणकर्त्याने खिडकीवर दगड मारल्याने काच फुटून एक प्रवासी जखमी झाला होता. (प्रतिनिधी)
>‘ब्लॅक स्पॉट’वर हवी पोलिसांची गस्त
ज्या मार्गावर रात्रीच्या वेळी नेहमीच अनुचित घटना घडतात त्या ‘ब्लॅक स्पॉट’वर पोलिसांची गस्त असायला हवी. आमच्या चालकांना यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळेच मोठा अनर्थ टाळता आला.
- राणा तिलकराम खुराणा व तुषार खुराणा, संचालक, खुराणा ट्रॅव्हल्स
मोटार वाहन कायद्यात तरतूद नाही
वाहनांचा आकार, योग्यता, सोयी, चालक आदींबाबत मोटार वाहन कायद्यात तरतूद आहे. मात्र प्रवासी वाहतुकीसुरक्षेसंदर्भात तरतूद नाही.
- शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

Web Title: Bus hijacking; Three closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.