वांद्रयात बसची बाईकला धडक, १ ठार

By admin | Published: April 16, 2016 08:56 AM2016-04-16T08:56:21+5:302016-04-16T08:56:51+5:30

क्रवारी रात्री वांद्र्यातील बीकेसीमध्ये एका बसची बाईकला धडक बसून झालेल्या अपघातात १ जण ठार झाला आहे.

A bus hit the vehicle in Bandra, killing 1 | वांद्रयात बसची बाईकला धडक, १ ठार

वांद्रयात बसची बाईकला धडक, १ ठार

Next
>ऑनलाइन लोकमत
वांद्रे, दि. १६ -  शुक्रवारी रात्री वांद्र्यातील बीकेसीमध्ये एका बसची बाईकला धडक बसून झालेल्या अपघातात १ जण ठार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरधरभाई मुलानी हे ४७ वर्षीय इसम बीकेसी येथे आपल्या दुचाकीवर थांबले होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एका बसने त्यांच्या बाईकला धडक दिली. त्यानंतर दुचाकीवर असलेले मुलानी यांचा पाय या अपघातात बसच्या चाकाखाली आला आणि ते बससोबत जवळपास २५-३० फूट फरफटत गेले.
या अपघातात त्यांच्या डोक्यालाही गंभीर जखम झाली. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बसचालकाला पोलिसांनी अटक केली असून आरोपीवर रँश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A bus hit the vehicle in Bandra, killing 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.