विक्रमगडकरांना हवे हक्काचे बसस्थानक
By admin | Published: January 7, 2017 03:10 AM2017-01-07T03:10:20+5:302017-01-07T03:10:20+5:30
तालुक्याच्या गावी अद्ययावत एसटी बसस्थानकच नसल्याने येथे प्रवाशांची गैरसोय होते.
विक्रमगड : तालुक्याच्या गावी अद्ययावत एसटी बसस्थानकच नसल्याने येथे प्रवाशांची गैरसोय होते. नेमक्या बस असल्याने प्रवाशांना उन्हाळयात उन्हात तर पावसाळयात पावसात ताटकळत रहावे लागते.़ विक्रमगड हे तालुक्यातील मुख्य शहराचे ठिकाण असतांनाही येथे तालुका निमिर्तीपासुन बसस्थानक नाही त्यामुळे पिकअपशेडवर काम भागविले जात आहे़ या ठिकाणी अद्यायावत बसस्थानक उभारण्याची मागणी गेल्या अनेकवर्षापासून केली जात असतांनाही याकडे कुणीही गांभीर्याने पाहात नाही़
विक्रमगड तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड लाखांच्या घरात असून शहराची लोकसंख्या २५ हजारावर गेली आहे़ येथे दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या अंदाजीत ६० ते ७० एस़टी बसची सेवा आहे. विक्रमगड शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालये बॅँका, शाळा, महाविद्यालय, इंजीनिअरिंग कॉलेज, आय़ टी़ आय व विविध आस्थापणांमध्ये काम करणारे असंख्य अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विदयार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे एस़ टी चे असंख्य प्रवासी असतात़ विक्रमगड शहर हे तालुक्यातील ९५ गावपाडयांचे मुख्यालय असल्याने दरारोज गाव-खेडेपाडयातून तसेच शहरातून विक्रमगमध्ये अगर विक्रमगहुन एसटी बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणु आदीविध ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतांत़ मात्र तालुक्याचे मुख्यालय असुनही विक्रमगड शहरात अद्यापही अद्यावत असे बसस्थानक नाही़ परिणामी प्रवाशांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ वृध्द, रुण, महिला प्रवासांसाठी प्रसाधगृहाची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अशा प्रवाशांचे मोठे हाल होतात. (वार्ताहर)
>दुकानदारांचे अतिक्रमण
एकंदरच मोठ्याप्रमाणात प्रवासी असतांना विक्रमगडमध्ये एसटी महामंडळाचे साधे पिकअप शेड आहे.
तेही प्रवाशांना असून नसल्यासारखेच आहे़ कारण शेड समोर एसटी बस थांब्यांसाठी जागाच शिल्लक राहात नाही़ तसेच अपुरी जागा असल्याने प्रवाशांना आजुबाजुला निवारा शोधावा लागतो.
तसेच लगतच किरकोळ दुकानदारांनी दुकाने थाटल्याने प्रवाशांना उभे राहाण्यासाठी जागा शिल्लक राहात नाही़
बसस्थानकाची मागणी
गेल्या अनेक वर्षांपासून विक्रमगड येथे विना उपयोग पिकअप शेड आहे. किमान नवीन पालघर जिल्हा अस्तित्वात आला असतांना व आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा हे येथील स्थानिक मतदार संघातील असल्याने त्यांनी तरी अशा बाबी लक्षात घेऊन या तालुक्याच्या मुख्यालयाच्या गावी अद्यायावत एस टी बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.