Business Idea: आयुष्यभर कमाई! या पानांची 50 झाडे लावा; वर्षाला 2.50 लाखांचे उत्पन्न मिळवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 04:42 PM2021-10-25T16:42:53+5:302021-10-25T16:43:57+5:30

earn money from farming: या शेतीमध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागणार असून आयुष्यभर तुम्ही या शेतीतून उत्पन्न मिळवू शकणार आहात. एवढेच नाही तर केंद्र सरकारदेखील तुम्हाला यासाठी मदत करेल.

Business Idea: Earning a Lifetime from Bay leaf Farming; 50 trees can give you Rs 2.50 lakh per annum | Business Idea: आयुष्यभर कमाई! या पानांची 50 झाडे लावा; वर्षाला 2.50 लाखांचे उत्पन्न मिळवा 

Business Idea: आयुष्यभर कमाई! या पानांची 50 झाडे लावा; वर्षाला 2.50 लाखांचे उत्पन्न मिळवा 

Next

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा चांगला भाव मिळत नाहीय. एकाच वेळा साऱ्या शेतकऱ्यांनी एकसारखेच उत्पादन घेतल्याने भाव कमालीचे घसरत आहेत. एवढे की आडत्याला उलट पैसे द्यावे लागतात. अशावेळी आम्ही तुम्हाला शेतीतून चांगले उत्पन्न घेण्याचे काही मार्ग (Business Idea from farming) सांगत आहोत. केवळ 50 झाडे लावून तुम्ही त्याच्या पानांपासून वर्षांला दीड ते दोन लाख रुपये कमवू (Extra Income) शकणार आहात. जाणून घ्या या शेतीबद्दल. 

या शेतीमध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागणार असून आयुष्यभर तुम्ही या शेतीतून उत्पन्न मिळवू शकणार आहात. एवढेच नाही तर केंद्र सरकारदेखील तुम्हाला यासाठी मदत करेल. आम्ही तुम्हाला तमालपत्राबाबत (Bay leaf Farming) सांगणार आहोत. तमालपत्र अनेकांच्या घरात जेवण बनविताना वापरले जाते. या शेतीसाठी सुरुवातीला मेहनत घ्यावी लागते. झाड मोठे झाले की केवल देखभाल करावी लागते. 

तमालपत्राचा वापर घराघरातच नाही तर मोठमोठ्या हॉटेल, हॉल आणि मेजवान्यांमध्ये देखील केला जातो. यामुळे तमालपत्राला मोठी मागणी आहे. तमालपत्राची शेती करणे खूप सोपी आहे आणि स्वस्तही आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तमालपत्राच्या शेतीसाठी कमी खर्च आणि जास्त फायदा शेतकरी मिळवू शकतो. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषधी बोर्डाकडून तमालपत्राच्या शेतीसाठी 30 टक्के अनुदानही दिले जाते. 

एका अंदाजानुसार तमालपत्राच्या एका रोपातून वर्षाला 3000 ते 5000 रुपयांची कमाई होते. म्हणजेच 50 रोपे लावली तर त्यापासून वर्षाला 1.50 लाख ते 2.50 लाख रुपये वर्षाला कमविता येतील. तमालपत्राचा वापर भारतातच नाही तर अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये केला जातो. याचा वापर सूप, बिर्याणी, मासे आणि अनेक प्रकारच्या भाज्या बनविण्यासाठी केला जातो. गरम मसाला म्हणून दैनंदिन वापर ही केला जातो. तमालपत्राचे उत्पादन भारताशिवाय रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स, उत्तर अमेरिका आणि बेल्जिअममध्ये घेतले जाते. 

संबंधित बातम्या...

Business Idea: काळी हळद लावा, बक्कळ पैसे कमवा! किलोला 5000 रुपयांपर्यंत किंमत

Business Idea: नोकरी करता करता सुरु करा हा व्यवसाय; 1 लाखांपर्यंत फायदा, केंद्राकडून 80 टक्के कर्ज

 

Web Title: Business Idea: Earning a Lifetime from Bay leaf Farming; 50 trees can give you Rs 2.50 lakh per annum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.