रोमँटिक वर्षासहलीसाठी बुशी डॅम
By admin | Published: August 10, 2014 12:08 AM2014-08-10T00:08:35+5:302014-08-10T00:08:35+5:30
मोस्ट रोमँटिक डेस्टिनेशन म्हणून बुशी डॅमचा उल्लेख केला जातो. वर्षासहलीसाठी तर ते अधिकच रोमँटिक आहे.
Next
> नंदकुमार टेणी ल्ल ठाणो
मोस्ट रोमँटिक डेस्टिनेशन म्हणून बुशी डॅमचा उल्लेख केला जातो. वर्षासहलीसाठी तर ते अधिकच रोमँटिक आहे. ब्रिटिशांनी रेल्वेला पाणीपुरवठा करण्यासाठी हे छोटेखानी धरण बांधले. त्याच्या बंधा:याखाली दोन-दोन फूट रुंदीच्या पाय:या केल्या आहेत. त्यामुळे या पाय:यांवर बसून अथवा चक्क लोळून आपल्याला वर्षासहलीचा आनंद मनमुराद लुटता येतो. पाण्याचा प्रवाह खळाळता पण सौम्य असेल तर भिजण्यातली रंगत आणखी वाढते. वरून धुवाधार पाऊस, सोबत सोसाटय़ाचे वादळवारे आणि त्याला या अवखळ प्रवाहाची साथ म्हणजे रोमँटिक त्रिवेणी संगमच असतो. जर सोबत मैत्रीण अथवा सौ असेल तर या सहलीची मजा अविस्मरणीय होऊन जाते.
लोणावळ्याजवळ हा डॅम आहे. मुंबई, ठाणो, कल्याण येथून हे अंतर 85 ते 9क् कि.मी. एकेरी आहे. म्हणजेच जाताना रस्ता दोन तासांचा आणि येताना दोन तासांचा. भिजायला चार-पाच तास आणि च्याऊम्यॅऊ साठी एक तास असे नऊ-दहा तास हाताशी असतील तर वर्षासहल बुशी डॅमलाच काढावी. ती जर दुचाकीवरून काढली तर जास्त परवडते. कारण जाताना-येताना चारचाकी वाहनांना जो टोल भरावा लागतो त्या टोलच्या पैशात दुचाकीचे पेट्रोल निघून जाते. शिवाय दुचाकीवरून सुसाट जाताना वर्षासहलीचा आनंद व भिजण्यातील मौज अधिक लुटता येते.
सकाळी 6 किंवा 7ला घराबाहेर आपल्या ग्रुपसोबत पडायचे. वाटेत पनवेल किंवा खोपोलीला चहा-कॉफी घ्यायची. लोणावळ्याला ब्रेकफास्ट करायचा आणि सरळ बुशी डॅम गाठायचा. लोणावळा ते डॅम हे अंतर अध्र्या तासाचे पण नाही. येथे खाद्यपदार्थ मिळतात. परंतु ते चकन्यासारखे खायचे आणि रस्त्यावरच्या एखाद्या नामांकित धाब्यावर शेवभाजी, भरीत भाकरी अशा गावरान मेनूचे जेवण करायचे ही खरी या सहलीची मजा.
येताना खोपोलीमधील गोल कांदाभजी, मिरचीची भजी याचा चहासोबत आस्वाद घ्यायचा. म्हणजे या सहलीची मजा आणखी वाढते. त्यात जर आणखी चस्का मारायचा असेल तर जेवणाचे डबे घरून न्यायचे आणि मुसळधार पावसात एखाद्या डेरेदार वृक्षाखाली सगळ्यांनी भरपावसात अंगत-पंगत करायची असाही बेत करता येतो. बसने जायचे असेल तर लोणावळ्याला पोहोचायचे आणि तेथून डॅमर्पयत जाण्यासाठी रिक्षा पकडायची हा मध्यम मार्गही वापरता येतो. परंतु त्यात वर्षासहलीचे थ्रील मात्र गवसत नाही.
च्बुशी डॅमला जाताना एक लक्षात ठेवायचे ते म्हणजे, वाहनाची गती चाळीसच्या पुढे न्यायची नाही. तसेच अंधार पडण्याआत परतायचे. कारण अनेकदा रस्त्यावर खड्डे असतात त्याचा अंदाज आला नाही तर अपघात किंवा वाहन बंद पडणो असे घडू शकते.
च्तसेच डॅमच्या पाय:यांवर चालताना त्यावर शेवाळे साठून त्या निसरडय़ा झालेल्या नाहीत ना? तसेच पाण्याचा प्रवाह किती गतिमान आहे, याची खात्री करून घ्यायची. जर पाय:या निसरडय़ा आणि प्रवाहाचा वेग जास्त असेल तर धबधब्याखालील कुंडात डुंबणो हे अधिक उत्तम ठरते. मग सांगा कधी निघताय बुशी डॅमच्या वर्षासहलीला!