"...पण भ्रष्ट संजय राऊतांवरील कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे," भाजप नेत्याचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 12:58 PM2022-07-31T12:58:13+5:302022-07-31T12:58:48+5:30
"पत्राचाळ घोटाळा म्हणजे शिवसेनेने मराठी माणसांच्या घरावर चालवलेला वरवंटा होता आणि हे निर्लज्ज आता मराठीच्या नावाने गळा कढतायत"
शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज (रविवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने त्यांच्या मुंबईतील भांडूप परिसरामधील मैत्री बंगल्यावर धाड टाकली. येथे ईडीकडून झाडाझडती आणि चौकशी सुरू आहे. यापार्श्वभूमीवर, आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
राऊतांवरील कारवाईनंतर भातखळकर यांनी ट्विट करत, "स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्या अपमानामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला नव्हता.... पण भ्रष्ट संजय राऊत यांच्यावर कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे," असे ट्विट केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्या अपमानामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला नव्हता....
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
पण भ्रष्ट संजय राऊत यांच्यावर कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे.
एवढेच नाही, तर आणखी एका ट्विट मध्ये भातखळकर म्हणाले, "करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही.... ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत." या शिवाय, "पत्राचाळ घोटाळा म्हणजे शिवसेनेने मराठी माणसांच्या घरावर चालवलेला वरवंटा होता आणि हे निर्लज्ज आता मराठीच्या नावाने गळा कढतायत," असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.
करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय. आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही....
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत.
घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत. pic.twitter.com/6r8CHkUCJL
तत्पूर्वी, संजय राऊत यांनी एकामागून एक काही ट्वीट्स केले आहेत, येका ट्विटमध्ये शिवसेनेचे चिन्ह टाकत, तरीही शिवसेना सोडणार नाही, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील असे म्हटले आहे. यानंतर त्यांनी ईडीच्या कारवाईवरही एक ट्वीट केले आहे. “खोटी कारवाई. खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र,” असेही राऊत यांनी म्हटले आहे.