लोणी काळभोरला घरफोडी; दागिने लंपास

By admin | Published: October 8, 2016 12:53 AM2016-10-08T00:53:17+5:302016-10-08T00:53:17+5:30

अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील ४० हजार रुपये किमतीचे २ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची घटना गुरुवारी (दि. ६) उघडकीस आली.

Butterflies in buttermilk; Jewelry lump | लोणी काळभोरला घरफोडी; दागिने लंपास

लोणी काळभोरला घरफोडी; दागिने लंपास

Next
तूर : अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास (एमएसडीपी) योजनेअंतर्गत लातूर शहर मनपाला मौलाना आझाद शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी ४ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र संकुलाला जागा मिळत नसल्याने हा निधी परत जाण्याची भीती आहे. दरम्यान, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दोन दिवसांत जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सर्वसाधारण सभेत दिले होते. पण नऊ दिवस उलटले तरी अद्याप जागा मिळाली नाही.
अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत लातूर महानगरपालिकेमार्फत तीनवेळा प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र त्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे शासनाकडून फेरप्रस्ताव पाठविण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार लातूर मनपाने फेरप्रस्ताव पाठविला असता तो मंजूर झाला आहे. या प्रस्तावानुसार मौलाना आझाद शैक्षणिक संकुलाची इमारत मंजूर झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी ४ कोटी ४० लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. या इमारतीत अल्पसंख्याक मुलांसाठी वसतिगृह, अभ्यासिका, ग्रंथालय, आरोग्य केंद्र बांधणे, स्वच्छतागृह करण्यात येणार आहे. परंतु, लातूर शहर हद्दीत अद्याप मनपाला जागा मिळाली नाही.
अंबाजोगाई रोडवरील बुस्टर पंपची जागा आहे. परंतु, ही जागा सोयीची आणि अपुरी पडत असल्याने या जागेचा ठराव सर्वसाधारण सभेत होऊ शकला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक राजा मणियार यांनी अल्पसंख्यांक योजनेला मुद्दाम जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप केला असून, त्यांनी शुक्रवारी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींना ४८ तासांच्या आश्वासनाचे काय झाले, असे पत्र पाठविले असून, जागा कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
कोंडवाड्याची जागा सोयीची...
टाऊन हॉलच्या परिसरालगत लातूर मनपाच्या कोंडवाड्याची जागा आहे. शिवाय, पटेल चौक येथेही लातूर मनपाच्या दवाखान्याची जागा आहे. या दोन्हीपैकी एका जागेत संकुल उभे करावे, अशी मागणी नगरसेवक राजा मणियार यांनी केली आहे. परंतु, ही जागाही अपुरी पडत असल्याने अन्य जागेचा शोध घेतला जात असल्याचे महापौर ॲड. दीपक सूळ यांनी सांगितले.

Web Title: Butterflies in buttermilk; Jewelry lump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.