‘नाफेड’मार्फत सोयाबीन खरेदी
By admin | Published: October 26, 2016 01:30 AM2016-10-26T01:30:59+5:302016-10-26T01:30:59+5:30
सोयाबीनला हमीभाव मिळण्यासाठी राज्यामध्ये ‘नाफेड’च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यास केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी परवानगी
मुंबई : सोयाबीनला हमीभाव मिळण्यासाठी राज्यामध्ये ‘नाफेड’च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यास केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी परवानगी दिल्याचे राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.
सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
त्याची दखल घेऊन फुंडकर यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी दूरध्वनीवरु न चर्चा केली. सोयाबीनला क्विंटलमागे १८०० ते २२०० रुपये भाव मिळत आहे. केंद्र शासनाने सोयाबीनसाठी २७४० रु पये हमीभाव जाहीर केला असताना आधारभूतपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे फुंडकर यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. (विशेष प्रतिनिधी)