चारधाम यात्रेसाठी रेल्वेसेवा सुरू करणार - सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:51 PM2017-07-30T14:51:47+5:302017-07-30T14:51:52+5:30

श्रध्देने लोकाना जिथे जिथे जायचयं तेथपर्यंत देशात रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. चारधाम यात्रेसाठी रेल्वेसेवा सुरू करणार

caaradhaama-yaataraesaathai-raelavaesaevaa-saurauu-karanaara-sauraesa-parabhauu | चारधाम यात्रेसाठी रेल्वेसेवा सुरू करणार - सुरेश प्रभू

चारधाम यात्रेसाठी रेल्वेसेवा सुरू करणार - सुरेश प्रभू

Next

शिर्डी : श्रध्देने लोकाना जिथे जिथे जायचयं तेथपर्यंत देशात रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. चारधाम यात्रेसाठी रेल्वेसेवा सुरू करणार असून लेह, लद्दाकमध्ये रेल्वे नेण्याचा विचार आहे. त्यासाठी रेल्वेचे सर्व्हेक्षण सुरू आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी शिर्डीत बोलताना सांगितले.
शिर्डी येथील साईनगर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी प्रभू बोलत होते. ते पुढे म्हणाले, जे काम लगेच होण्यासारखे आहेत, ते तातडीने सुरू केले आहेत. जे होणार नाहीत, त्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. रेल्वेकडून देशातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कोणत्याही मार्गाने आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे काम आम्ही करीत आहोत. सर्वसामान्य माणसांच्या हिताचे काम आम्ही करीत असून विकासाचा बॅकलॉग भरुन काढला जात आहे. देशात साडेआठ लाख कोटी रुपये रेल्वे विकासावर खर्च केले जाणार असून राज्यातील रेल्वे विकासावर दीड लाख कोटी खर्च केले जाणार आहेत. अनेक नवीन रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद केली आहे, असेही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

प्रभूंच्या भाषणातील ठळक मुद्दे - 

चार धाम यात्रेसाठी रेल्वे सेवा सुरू करणार...
रेल्वेचे सर्वेक्षण सुरू...
लेह लद्दाखमध्ये रेल्वे पोहचवणार....
देशातील अनेक ठिकाणी रेल्वे सुरू करणार. 
श्रद्धेने लोकांना जिथे जिथे जायचंय तीथ पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार... 
जे काम होण्यासारखं आहे ते लगेच केलं जातय...
जे होणार नाही त्यासाठी प्रयत्न केला जातोय...
रेल्वेकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत...
कोणत्याही मार्गाने आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचं काम...
रेल्वेचा विकास व्हावा, सर्व सामान्य माणसाच्या हिताचे काम करतोय....
बॅकलाॅग भरून काढला जातोय....
रेल्वे स्थानकावर 20 ठिकाणी एक रूपयात मिनरल वाटर सेवा सुरू....
देशामध्ये साडे आठ लाख कोटी रूपये रेल्वे विकासावर खर्च होणार....
राज्यातील रेल्वे विकासावर दिडलाख कोटी खर्च केले जाणार....
अनेक नविन रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद....
सर्व सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल

Web Title: caaradhaama-yaataraesaathai-raelavaesaevaa-saurauu-karanaara-sauraesa-parabhauu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.