उसाला बंदी !
By admin | Published: September 1, 2015 12:59 AM2015-09-01T00:59:32+5:302015-09-01T00:59:32+5:30
आॅगस्ट महिना संपल्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने यंदा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई : आॅगस्ट महिना संपल्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने यंदा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन सरकारने धरणातील पाणीसाठे पाण्यासाठी राखीव ठेवले आहेत. याउपरही परिस्थिती गंभीर बनली तर ऊस लागवड आणि गाळपावर निर्बंध आणले जाऊ शकतात, असे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.दुष्काळाचा फटका बसलेल्या
भागात ८६ साखर कारखाने असून तेथे नव्याने साखर कारखाना सुरु करण्यास तसेच उसाचे क्षेत्र वाढविण्यास परवानगी देऊ नये, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या काही भागात पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य उभे राहिले आहे.
त्यामुळे सरकारने सर्वप्रथम लोकांचे पिण्याचे पाणी, जनावरे व त्यानंतर शेती व औद्योगिक वापरासाठी पाणी देण्यास प्राधान्य दिले आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली. त्यामुळे राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे समजत आहे
उसाच्या शेतीला खूप
पाणी लागत असल्याने त्याच्या लागवडीवर निर्बंध आणण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे त्यांनी
स्पष्ट केले. अर्थात त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असेही खडसे म्हणाले.
(विशेष प्रतिनिधी)