‘बीडीडी’ पुनर्विकासाला मंत्रिमंडळाची मान्यता
By admin | Published: March 18, 2016 04:03 AM2016-03-18T04:03:59+5:302016-03-18T04:03:59+5:30
वरळी, लोअर परळ, शिवडी आणि नायगाव येथे असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. पुनर्विकासाचे काम करण्यासाठी म्हाडा ही नोडल
Next
मुंबई : वरळी, लोअर परळ, शिवडी आणि नायगाव येथे असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. पुनर्विकासाचे काम करण्यासाठी म्हाडा ही नोडल एजन्सी असेल. या निर्णयामुळे जुन्या मोडकळीस आलेल्या या चाळींच्या जागी नवीन अत्याधुनिक टोलेजंग इमारती उभ्या राहणार आहेत. बीडीडी चाळींमध्ये सध्या २०७ इमारती असून त्यामध्ये हजारो कुटुंबे राहतात. ९२ एकरचा हा परिसर आहे. यातील शिवडीची जागा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुनर्विकासाबाबत शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी नाराजीचा सूर लावल्याची माहिती आहे.