मंत्रिमंडळ विस्ताराला एप्रिलचा मुहूर्त, मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:33 AM2018-03-30T06:33:26+5:302018-03-30T06:33:26+5:30

अनेकांचे देव पाण्यात, कोणाला मिळणार डच्चू?

Cabinet expansion in April, Chief Minister said only | मंत्रिमंडळ विस्ताराला एप्रिलचा मुहूर्त, मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती

मंत्रिमंडळ विस्ताराला एप्रिलचा मुहूर्त, मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती

Next

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त काढण्यात आला आहे. स्वत: मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पत्रकारांना दिली. त्यामुळे संभाव्य नावांच्या चर्चेबरोबर
कोणाकोणाला डच्चू मिळणार याचेही आडाखे बांधले जात आहेत.
केंद्र व राज्यातील भाजपा प्रणीत सरकार आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा हा कदाचित शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. मंत्रिमंडळात या वेळी आणखी तीन मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी मिळू शकते.
जागावाटपानुसार भाजपाकडे ३० तर शिवसेनेकडे १२ मंत्रीपदे येतात. त्यापैकी शिवसेनेने आपला कोटा यापूर्वीच भरला आहे. त्यामुळे हा विस्तार फक्त भाजपाचाच असेल. त्यात एक कॅबिनेट आणि
दोन राज्यमंत्र्यांचा समावेश केला
जाऊ शकतो.

कामगिरीच्या आधारावर मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय झाल्यास आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकरांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झालीच तर विष्णू सावरा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

Web Title: Cabinet expansion in April, Chief Minister said only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.