Cabinet Meeting: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा; मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 05:01 PM2021-08-26T17:01:43+5:302021-08-26T17:03:43+5:30

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Cabinet Meeting Decision: CM Uddhav Thackeray offers great relief to state officials | Cabinet Meeting: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा; मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय

Cabinet Meeting: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा; मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय

googlenewsNext

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील हे अनुकंपा धोरण लागू करावे.

कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांची देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून " महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१ तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील

राज्य मंत्रिमंडळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय

शासकीय अधिकाऱ्यांना देखील अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू. निधन झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास नियुक्ती देणार (सामान्य प्रशासन)

कुटुंब न्यायालयातील सरळसेवेने नियुक्त न्यायाधीशांना जिल्हा न्यायाधीश (प्रथम प्रवेश, निवड श्रेणी, उच्च समयश्रेणी)  वेतनश्रेणी लागू (विधि व न्याय विभाग)

राज्य तंत्रशिक्षण मंडळ, अधिनियम-१९९७ मधील कलमांमध्ये सुधारणा (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तकांचा मोबदला वाढविला (सार्वजनिक आरोग्य विभाग)

केंद्राच्या योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापनाबाबत  बँक खाती उघडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा (वित्त विभाग)

कृषी आधारीत व अन्न प्रक्रिया उद्योगांना सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मोठ्या व विशाल प्रकल्पांसाठी विहीत गुंतवणूक, रोजगाराचे निकष आणि प्रोत्साहने सुधारीत करणार (उद्योग विभाग)

Read in English

Web Title: Cabinet Meeting Decision: CM Uddhav Thackeray offers great relief to state officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.