शिवसेनेचा ‘अभासे’सोबत काडीमोड!

By admin | Published: October 26, 2016 05:00 AM2016-10-26T05:00:03+5:302016-10-26T05:00:03+5:30

दक्षिण मुंबईतील चर्चेचा वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या ‘ई’ वॉर्डमध्ये यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत

Cadimode with Shivsena's 'Achae'! | शिवसेनेचा ‘अभासे’सोबत काडीमोड!

शिवसेनेचा ‘अभासे’सोबत काडीमोड!

Next

- चेतन ननावरे, मुंबई

दक्षिण मुंबईतील चर्चेचा वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या ‘ई’ वॉर्डमध्ये यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत या ठिकाणी काँग्रेस, शिवसेना, अखिल भारतीय सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वच पक्षांचे वर्चस्व दिसले होते. मात्र यंदा भारतीय जनता पक्षासोबत काडीमोड घेण्याच्या विचारात असलेली शिवसेना अखिल भारतीय सेनेसोबतची युतीही तोडण्याचा विचार करत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. तसे झाल्यास अभासेसमोरील समस्या वाढणार असून राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
प्रभागरचनेत झालेल्या बदलाचा मोठा फटका ‘ई’ वॉर्डला बसला आहे. गेल्या वेळी वॉर्डमध्ये आठ नगरसेवक पदांसाठी निवडणुका रंगल्या होत्या. मात्र यंदा वॉर्डमधील एक प्रभाग दुसऱ्या वॉर्डमध्ये सरकला आहे. त्यामुळे केवळ सात प्रभागांसाठी निवडणुका रंगणार आहेत. २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीनुसार ई वॉर्डमध्ये काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन, अभासेचे दोन आणि मनसेचा एक नगरसेवक होता. तर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. याउलट काँग्रेस आणि सेनेच्या प्रत्येकी एका उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता. लोकसभा व विधानसभेतील मतांची संख्या पाहता, तूर्तास काँग्रेसला तरी या ठिकाणी आहे त्या जागेवरील सत्ता टिकवण्याचे आव्हान असेल. नव्या प्रभाग रचनेनंतर वॉर्डमध्ये अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी प्रत्येकी एक प्रभाग राखीव झाला आहे तर पाच खुले प्रभाग निर्माण झाले आहेत. खुल्या प्रभागांमधील दोन प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत.

राणीबागेचा मुद्दा गाजणार!
राणीबाग हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राणिसंग्रहालय ‘ई’ वॉर्डमध्ये येते. राणीबागेचा रखडलेला पुनर्विकास व नुकतेच मरण पावलेले पेंग्विन हे कळीचे मुद्दे ठरतील. मातंग समाजाची मते मिळवण्यासाठी अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचा विषयही वापरला जाईल.

‘अभासे’ची वाट बिकट!
गीता गवळी आणि वंदना गवळी या दोन्ही नगरसेविकांच्या प्रभागात बरेच बदल झाले आहेत. त्यात गेल्या वेळी अपक्ष राहत गवळी यांना बऱ्यापैकी टक्कर दिलेल्या रोहिदास लोखंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याशिवाय विधानसभेत गवळी यांच्या प्रभागातून खोऱ्याने मते मिळवलेल्या एमआयएमचे आव्हानही गवळी यांच्यासमोर राहील.

मनसे डोके वर काढणार?
गेल्या निवडणुकीत एक जागा जिंकून मनसेला दोन जागांवर थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. नव्या प्रभाग रचनेला फायदा शिवसेनेसोबत मनसेलाही होणार आहे. त्यामुळे अभासेसोबत युती तोडल्यानंतर शिवसेना किंवा मनसेच्या जागांत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रभाग क्रमांक - २०७
आरक्षण खुला (महिला)
एकूण लोकसंख्या : ५३,८४८
अनुसूचित जाती : ५,२५३
अनुसूचित जमाती : ३३७
प्रभागाची व्याप्ती : कस्तुरबा रुग्णालय, भायखळा रेल्वे स्थानक, डॉ. कंपाउंड

प्रभाग क्रमांक - २०८
आरक्षण खुला
एकूण लोकसंख्या : ५७,१२१
अनुसूचित जाती : २,१५२
अनुसूचित जमाती : ३४७
प्रभागाची व्याप्ती : फेरबंदर, जिजामाता उद्यान, घोडपदेव, ठक्कर इस्टेट

प्रभाग क्रमांक - २०९
आरक्षण खुला
एकूण लोकसंख्या : ५५,६२२
अनुसूचित जाती : ३,३५५
अनुसूचित जमाती : ९२६
प्रभागाची व्याप्ती : दारुखाना, एकतानगर, वाडी बंदर व अंजीरवाडी

प्रभाग क्रमांक - २१०
आरक्षण अनुसूचित जाती (महिला)
एकूण लोकसंख्या : ५२,०७०
अनुसूचित जाती : ५,८७८
अनुसूचित जमाती : ४२९
प्रभागाची व्याप्ती : जे.जे. रुग्णालय, ताडवाडी, मुस्तफा बाजार

प्रभाग क्रमांक - २११
आरक्षण इतर मागासवर्ग
एकूण लोकसंख्या : ५९,६४१
अनुसूचित जाती : ४१०
अनुसूचित जमाती : ११४
प्रभागाची व्याप्ती : मदनपुरा, न्यू नागपाडा, भायखळा अग्निशमन दल केंद्र

प्रभाग क्रमांक -२१२
आरक्षण खुला (महिला)
एकूण लोकसंख्या : ५६,२७८
अनुसूचित जाती : २,१७८
अनुसूचित जमाती : १४१
प्रभागाची व्याप्ती : आग्रीपाडा, आर.टी.ओ., भायखळा (प), वाय.एम.सी. मैदान

प्रभाग क्रमांक - २१३
आरक्षण खुला
एकूण लोकसंख्या : ५८,२८७
अनुसूचित जाती : २,९६६
अनुसूचित जमाती : ३१३
प्रभागाची व्याप्ती :
काजीपुरा, सिद्धार्थनगर, छोटा सोनापूर

२०१२मधील ई वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवार

वॉर्डविजयी उमेदवारप्राप्त मतेपराभूत उमेदवार प्राप्त मते
२०२समिता नाईक (मनसे)९,३०९ स्मिता बनसोड (राष्ट्रवादी काँग्रेस)६,९४०
२०३रमाकांत रहाटे (शिवसेना)९,९८५ नितीन केरकर (मनसे) ८,६१४
२०४वंदना गवळी (अभासे)८,२७९ रोहिदास लोखंडे (अपक्ष) ५,२५७
२०५गीता गवळी (अभासे)९,१३८ अब्दुल काजी (काँग्रेस) ४,३४०
२०६फैयाज खान (काँग्रेस)१०,८६० भारतकुमार जैन (भाजपा) २,७२२
२०७यामिनी जाधव (शिवसेना)७,१५६ हर्षदा सुर्वे (राष्ट्रवादी काँग्रेस)६,१०४
२०८मनोज जामसुतकर (काँग्रेस)७,५८१ यशवंत जाधव (शिवसेना) ४,५४६
२०९शहाना खान (काँग्रेस)६,५९६ आशा मामिडी (मनसे) ६,२३१

Web Title: Cadimode with Shivsena's 'Achae'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.