केडीएमसीसाठी आघाडी पक्की!
By admin | Published: October 11, 2015 05:03 AM2015-10-11T05:03:06+5:302015-10-11T05:03:06+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित झाली असून, ६०-४०च्या समीकरणानुसार तिकिटांचे वाटप करण्यात येणार आहे.
अखेर जमले : काँगे्रस ६०, राष्ट्रवादी ४० जागा लढणार
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित झाली असून, ६०-४०च्या समीकरणानुसार तिकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. शनिवारी गांधी भवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. अखेर, पाच बैठकांनंतर या समीकरणाला राष्ट्रवादीने संमती दिली. त्यापैकी एकूण १०१ जागांपैकी ६० टक्के काँग्रेसच्या तर ४० टक्के जागा या एनसीपीच्या वाट्याला येणार आहेत. काँग्रेसचे निरीक्षक संजय चौपाने यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पक्षांचे प्रांताध्यक्ष याबाबतची घोषणा करणार आहेत. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, ६०-४० असा जरी फॉर्म्युला ठरला असला तरीही प्रत्यक्षात काँग्रेसला ५६, एनसीपीला ४१ आणि ४ जागा या मैत्रीपूर्ण लढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबतची घोषणा दोन्ही पक्षांचे प्रांताध्यक्ष करणार आहेत.