‘जीवनदायी’ ठरणारे निवडुंग मृत्यूपंथाला!

By Admin | Published: September 11, 2015 09:29 PM2015-09-11T21:29:24+5:302015-09-11T23:40:00+5:30

संवर्धन गरजेचे : कमजोर हृदयाला बळकटी देण्याचे काम

Caitang hanging out for life! | ‘जीवनदायी’ ठरणारे निवडुंग मृत्यूपंथाला!

‘जीवनदायी’ ठरणारे निवडुंग मृत्यूपंथाला!

googlenewsNext

श्रीकांत चाळके - खेड --विज्ञानाने सर्वदूर शोध लावल्यानंतरही काही वनस्पती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत़ यात कडुनिंबासारखी वनस्पती अनेक शारीरिक कमजोरींवर गुणकारी आहे़ मात्र, हृदय कमजोर झाल्यास त्याला बळकटी आणून धडधड सामान्य करणारा आणि आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ संबोधलेला निवडूंग दुर्मिळ झाला आहे़ निवडूंगचे विविध गुण जोपासण्यात तसेच त्याचे संवर्धन करण्यात शासन पातळीवर उदासीनता दिसून येत असल्याने बहुगुणी असलेला हा निवडूंग आता मृत्यूपंथाला लागला आहे़सिमेंटच्या वाढलेल्या जंगलात आपल्यावर रासायनिक फवारे मारलेली आणि पावडर टाकून अकाली कृत्रिम पिकवलेली फळे खाण्याची वेळ आली आहे़ अशा काळात आयुर्वेदाने वाखाणलेली नागाची फणी आकाराचे अथवा पंचकोनी निवडूंग डोंगरदऱ्यांतून लुप्त होत चालले आहे.़ हृदयाची दुर्बलता निवडूंग रसाने दूर होते़, असे आयुर्वेदात म्हटले आहे. पूर्वी कोकणातील डोंगरदऱ्यांमध्ये निवडूंग नजरेला पडत असे़ मात्र, येथील निवडुंगांना फळे येत नव्हती़ या निवडुंगाचा कुंपणासाठी चांगला वापर होत असे. कोकणात बांधावर कुंपणात दिसणारा निवडूंग तसेच दोन दशके कोकणात फळरहीत आढळणारा निवडूंग आज दुर्मीळ झाला आहे.़ मराठवाडा विभागात डोंगरदऱ्यांतून पूर्वी मुबलक प्रमाणात या फळरहीत निवडुंगाचे दर्शन होत होते़ याच निवडुंगाच्या फळांचा उपयोग शरिरातील धोकादायक आजारांवर होत आहे़ असे हे बहुगणी आणि दीर्घकालीन उपयोगी असलेले निवडूंग दुर्मीळ होऊ लागले आहे. निवडूंंग उष्ण कटिबंध आणि ओसाड जंगल व दऱ्याखाऱ्यातून आढळते़ डोंगरदऱ्यातील शेतीला कुंपण म्हणूनही याचा वापर होतो़ पूर्वी आदिवासी लोक द्रोण, पत्रावळी तसेच बिडी तयार करण्यासाठी पळसाची पाने तोडण्यासाठी जात असत तेव्हा निवडुंगाची पिकलेली फळे खाऊन ते या रानमेव्याचा आस्वाद घेत. निवडुंगाच्या रस सेवनाने भुक वाढते. कफ विकारावरही हे गुणकारी आहे.़ सतत होणारा मूत्रविकार तसेच दाह, हृदयविकारावर या फळाचा रस गुणकारी आहे़ या गुणकारी निवडुंगाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

बंजारा समाज व आदीवासी लोक निवडुंगाची बोंड आवडीने खातात़, असे येथील भरणे व खेड परिसरातील आयुर्वेदाचार्य सांगतात़ या फळात ४१ टक्के शर्करा, साडेसहा टक्के मांसजन्य घटक, ३० टक्के साखर असते व उर्वरीत भाग चोथा असतो़ शिशिर ऋतुत या झाडांना फळे येतात. फळांपासून सरबत केले जाते तर काही ठिकाणी फळे भाजून खाल्ली जातात. कफ व दम्यासाठी हे गुणकारी आहे़ आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ म्हणून याचा आवर्जून उल्लेख केला असला तरी हे निवडूंग आता मृत्यूपंथाला लागले आहे़

Web Title: Caitang hanging out for life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.