कर्ज बुडव्यांचा १५ आॅगस्टनंतर हिशोब घेऊ - गुलाबराव पाटील
By admin | Published: August 7, 2016 11:56 PM2016-08-07T23:56:50+5:302016-08-07T23:56:50+5:30
ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण आपल्या स्टाईलने हा प्रश्न सोडवू. कर्ज बुडविणारे व सहकार खात्याचे नाव खराब करणाऱ्यांचा १५ आॅगस्टनंतर हिशोब घेऊ
ऑनलाइन लोकमत
जळगाव- ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण आपल्या स्टाईलने हा प्रश्न सोडवू. कर्ज बुडविणारे व सहकार खात्याचे नाव खराब करणाऱ्यांचा १५ आॅगस्टनंतर हिशोब घेऊ, असा इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी पारोळा येथे दिला.
ग.स. सोसायटीच्या पारोळा शाखेच्या नूतन वास्तुच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आपण ज्याच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, मोर्चे काढले त्याच विभागाचे मंत्रीपद मिळाल्याने आता मंत्रीपदाचा उपयोग जनतेच्या हितासाठी करू.
सरकारमध्ये असल्याने आता घाबरून बोलावे लागते. वसुलीची ८८ची नोटीस देतांना वसुली अधिकारीकडून पैसा खाल्ला जातो. परंतु एकदा १५ आॅगस्टचे झेंडावंदन होऊ द्या, मग कर्जदार कसे कर्ज थकीत ठेवतो, बोगस कर्ज कसे वाटून झाले याचा हिशोब घेऊ, असेही ते म्हणाले.