कॉल सेंटर प्रकरणाचा ‘कथालेखक’ अटकेत : कोट्यवधीची खंडणी उकळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 03:44 AM2017-09-07T03:44:27+5:302017-09-07T03:45:08+5:30
अमेरिकी नागरिकांना आयआरएसच्या नावे कशा प्रकारे लुबाडले जाऊ शकते, याचा कट रचणाºया बोगस कॉल सेंटर प्रकरणातील ब्रिजेश पटेल या मुख्य आरोपीला ठाणे पोलिसांनी अहमदाबादेतून अटक केली.
राजू ओढे
ठाणे : अमेरिकी नागरिकांना आयआरएसच्या नावे कशा प्रकारे लुबाडले जाऊ शकते, याचा कट रचणाºया बोगस कॉल सेंटर प्रकरणातील ब्रिजेश पटेल या मुख्य आरोपीला ठाणे पोलिसांनी अहमदाबादेतून अटक केली.
कर चुकविणा-या अमेरिकेतील नागरिकांशी आयआरएस (इंटर्नल रिव्हेन्यू सर्व्हिसेस) अधिकाºयांच्या नावे संपर्क साधून, त्यांच्याकडून खंडणी उकळणा-या ठाण्यातील बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी गतवर्षी पर्दाफाश केला होता. अमेरिकी नागरिकांमध्ये आयआरएसची दहशत असते. त्यामुळे हा वापर करून, खंडणी वसूल करणे शक्य असल्याचा कट, सर्वप्रथम ब्रिजेश पटेलने जगदीश कन्नानीसमोर मांडला होता. कन्नानीने होकार दिला. यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली. शॅगीला अटक केल्यापासून पोलीस ब्रिजेश पटेलच्या मागावर होते. ब्रिजेश सध्या पोलीस कोठडीत असून, त्याचा या प्रकरणाशी संबंध आणि त्याच्या इतर सहकाºयांची माहिती काढण्याचा प्रयत्न ठाणे पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे.
आर्थिक व्यवहारांत सहभाग
बोगस कॉल सेंटरमधून आयआरएसच्या नावे कारवाईची धमकी दिल्यानंतर, काही नागरिक आरोपींच्या गळाला लागत होते. अशा नागरिकांना आरोपी आयट्यून कार्ड विकत घेण्यास सांगायचे. त्या कार्डावरील १६ अंकी क्रमांक पीडित नागरिकाकडून मिळावल्यानंतर, कार्डाची रक्कम आरोपींना रोख स्वरूपात मिळायची. ब्रिजेश पटेल हा बोगस कॉल सेंटरच्या अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता.