गुडेवारांच्या समर्थनार्थ उद्या ‘सोलापूर बंद’ची हाक

By admin | Published: June 25, 2014 01:19 AM2014-06-25T01:19:08+5:302014-06-25T01:19:08+5:30

महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता गुरुवारी सोलापूर बंदची हाक सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आह़े

Call of 'Solapur Bandh' in support of Gudewar | गुडेवारांच्या समर्थनार्थ उद्या ‘सोलापूर बंद’ची हाक

गुडेवारांच्या समर्थनार्थ उद्या ‘सोलापूर बंद’ची हाक

Next
>सोलापूर : महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता गुरुवारी सोलापूर बंदची हाक सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आह़े 
भाजपा आमदार विजयकुमार देशमुख हे बंदचे नेतृत्व करणार असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली़ काँग्रेस पक्षाने मात्र बैठक घेऊन विरोधकांचा हा बंद हाणून पाडा, नगरसेवक व पदाधिका:यांनी दुकाने बंद करू देऊ नयेत; ताकद दाखवा, असे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी केले आह़े  विजयकुमार देशमुख, माकपाचे नरसय्या आडम, बसपाचे आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण आदींनी एकत्र येऊन बंदचा निर्णय आज जाहीर केला़ (प्रतिनिधी) 
 
पालिका कामगारांना उशिरा सुचले शहाणपण
च्गुडेवार यांनी 2क्क् कोटींवर उत्पन्न जाणा:या पालिकेच्या तिजोरीत 3क्6 कोटी जमा करून दाखविल़े कर्मचा:यांना तब्बल 4क् टक्के पगारवाढ दिली़ असे असतानाही पालिकेतील कामगारांनी आणि त्या संघटनेच्या पुढा:यांनी दोन दिवस काही केले नाही़ टीकेची झोड उठल्यानंतर कामगार नेते अशोक जानराव यांनी बुधवारी कामगार काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे सांगितल़े मात्र बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल़े

Web Title: Call of 'Solapur Bandh' in support of Gudewar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.