शेतकऱ्यांसाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:48 AM2018-05-04T05:48:20+5:302018-05-04T05:48:20+5:30

दिवसेंदिवस वाढत जाणाºया अन्यायामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सरकारही याप्रश्नी उदासीन असून शेतकºयांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे

Call a special session of the Lok Sabha for the farmers | शेतकऱ्यांसाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे

शेतकऱ्यांसाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे

Next

जळगाव : दिवसेंदिवस वाढत जाणाºया अन्यायामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सरकारही याप्रश्नी उदासीन असून शेतकºयांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
शेतकºयांच्या प्रश्नी देशभरातील १९३ शेतकरी संघटनांना एकत्र करुन अ. भा. किसान संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून त्यामार्फत विशेष अधिवेशन मागणीचे निवेदन देशभरातील जिल्हाधिकाºयांना देण्यात येणार आहे. कर्जमुक्ती आणि हमीभाव ही दोन विधेयके या अधिवेशनात मंजूर करावी अशी अपेक्षा आहे. या अधिवेशनात कोण शेतकºयांसोबत आहे, हे सुद्धा दिसून येईल, असेही शेट्टी म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १ मेपासून शेतकरी सन्मान अभियान सुरू करण्यात आले आहे. मंत्रालयात आत्महत्या करणारे धुळे जिल्ह्णातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून हे अभियान सुरु झाले आहे.
शेत मालाला योग्य भाव न मिळणे, वाढता कर्जाचा बोजा आदी कारणांमुळे शेतकरी प्रचंड निराश झाला आहे. यातून आत्महत्येचे विचार त्याचा मनात येतात. या विचारांपासून परावृत्त करुन ‘मरायचे नाही, तर लढायचे’अशी जिद्द शेतकºयांमध्ये निर्माण करण्यासाठी हे अभियान हाती घेतल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Call a special session of the Lok Sabha for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.