केईएममधील चेंजिंग रुममध्ये कॅमेरा

By admin | Published: August 23, 2016 06:13 AM2016-08-23T06:13:46+5:302016-08-23T06:13:46+5:30

केईएम रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरच्या चेंजिंग रुममध्ये एका कर्मचाऱ्याने छुपा कॅमेरा ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला

Camera in the changing room in KEM | केईएममधील चेंजिंग रुममध्ये कॅमेरा

केईएममधील चेंजिंग रुममध्ये कॅमेरा

Next


मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरच्या चेंजिंग रुममध्ये एका कर्मचाऱ्याने छुपा कॅमेरा ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. हा प्रकार उघडकीस आल्यावर तत्काळ त्या कर्मचाऱ्याला (सर्व्हंट) निलंबित करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’ला दिली.
केईएम रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारांसाठी येत असतात. त्याचबरोबर शेकडो शस्त्रक्रिया होत असतात. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, म्हणून डॉक्टर कपडे बदलून विशिष्ट प्रकारचे कपडे घालूनच आॅपरेशन थिएटरमध्ये जातात. यासाठी पुरुष आणि महिला डॉक्टरांना थिएटर जवळ कपडे बदलण्यासाठी एक खोली असते. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या चेंजिंग रुममध्ये एका कर्मचाऱ्याने मोबाईल लपवून ठेवल्याची घटना निवासी डॉक्टरांकडून शुक्रवारी उघडकीस आली आहे.
या चेंजिंग रुममध्ये पुठ्ठ्याच्या खोक्यात रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने मोबाईल लपवून ठेवला होता. या मोबाईलचा कॅमेरा सुरु ठेवून व्हिडिओ मोडवर ठेवण्यात आला होता. आॅपरेशन थिटएटरमध्ये जाण्याची घाई महिला डॉक्टरांना असल्यामुळे पहिल्यांदा हा प्रकार लक्षात आला नाही. पण, त्यानंतर एका महिला डॉक्टरला हा प्रकार लक्षात आल्यावर तिने मोबाईल ताब्यात घेतला. त्यावेळी या मोबाईलमध्ये व्हिडिओचे चित्रीकरण झाल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ या विषयीची माहिती रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांना आणि रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली. सुरक्षा कार्यालयात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातही या कर्मचाऱ्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
या मोबाईलमध्ये काही व्हिडिओचे चित्रीकरण झाल्याचे उघड झाल्यामुळे महिला डॉक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये ताण निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या निषेधार्थ केईएम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी कॅण्डल मार्च काढला
होता. (प्रतिनिधी)
>कर्मचारी निलंबित
आॅपरेशन थिएटरच्या चेजिंग रुममध्ये एका कर्मचाऱ्याने मोबाईल ठेवल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. यानंतर तत्काळ त्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रुग्णालयातर्फे अंतर्गत चौकशी समिती बसवण्यात आली आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर पुढील कारवाई ठरवण्यात येईल. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Web Title: Camera in the changing room in KEM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.