बिल्डरच्या चुकीची शिक्षा कॅम्पा कोलाला नको!
By admin | Published: June 10, 2014 02:05 AM2014-06-10T02:05:16+5:302014-06-10T02:05:16+5:30
वरळी येथील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील इमारतीच्या बेकायदा मजल्यावरील रहिवाशांच्या पाठीशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर उभ्या राहिल्या आहेत.
Next
>लतादीदींचे टि¦ट : सारेच चकित!
मुंबई : वरळी येथील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील इमारतीच्या बेकायदा मजल्यावरील रहिवाशांच्या पाठीशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर उभ्या राहिल्या आहेत. ‘बिल्डरच्या चुकीची शिक्षा येथील रहिवाशांना नको..’ असे लतादीदी यांनी सोशल नेटवर्क साईटवर ट्विट करत कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना पाठीशी घातले आहे.
सोमवारी लतादीदी यांनी कॅम्पा कोला रहिवाशांच्या बाजूने ट्विट केले असून; यात त्या म्हणतात, ‘कॅम्पा कोला प्रकरणात मला महाराष्ट्र सरकारला एक गोष्ट ध्यानात आणून द्यायची आहे. येथील घरे तोडण्यात आली तर हजारो लोक बेघर होतील. ज्यात अनेक लहाने मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. आजवर येथील तीन व्यक्तींचे कारवाईच्या धसक्याने निधन झाले आहे. बिल्डरच्या चुकीची शिक्षा सर्वसामान्य माणसाला भोगावी लागणो; म्हणजे अन्याय आहे.’ गेल्या आठवडय़ात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पा कोलाच्या रहिवाशांची याचिका फेटाळली होती. परिणामी, येथील इमारतीमधील बेकायदा मजल्यावरील रहिवाशांनी सदनिका रिकाम्या करण्यास सुरुवात केली होती. (प्रतिनिधी)