प्रचाराचे अवैध होर्डिग्ज काढण्यासाठी मोहीम राबवा - हायकोर्ट
By admin | Published: October 1, 2014 02:30 AM2014-10-01T02:30:44+5:302014-10-01T02:30:44+5:30
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणारे अवैध होर्डिग्ज काढण्यासाठी सर्व महापालिका, नगरपालिका व स्थानिक प्रशासनांनी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिल़े
Next
>मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणारे अवैध होर्डिग्ज काढण्यासाठी सर्व महापालिका, नगरपालिका व स्थानिक प्रशासनांनी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिल़े
न्या़ अभय ओक व न्या़ गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिल़े ही मोहीम राबवताना टोल फ्री फोन नंबर व एसएमएस सेवा सुरू करा़ याद्वारे किती तक्रारी आल्या व किती अवैध होर्डिग्ज काढले याची नोंद करून ठेवा़ तसेच वैध होर्डिग्जची मुदत संपल्यानंतर असे होर्डिग्जही काढून टाकावेत व ही सर्व कारवाई करण्यासाठी विशेष अधिका:याची नेमणूक प्रशासनाने करावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आह़े ही मोहीम मतदानानंतरही 1क् दिवस सुरू ठेवावी व त्याचा कृती अहवाल न्यायालयात सादर करावा़ त्यानंतर असे अवैध होर्डिग्ज लावणा:यांकडून किती दंड वसूल करावा याचे आदेश दिले जातील, असे देखील न्यायालयाने स्पष्ट केल़े मुंबईसह इतर जिल्ह्यांतील अवैध होर्डिग्जवर कारवाईसाठी संबंधित ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी स्वतंत्र जनहित याचिका दाखल केल्या आहेत़ (प्रतिनिधी)
भाजपा व राष्ट्रवादीपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील त्यांचे कार्यकर्ते अवैध होर्डिग्ज लावणार नसल्याची हमी प्रतिज्ञापत्रवर न्यायालयात दिली़ आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो व यासाठी सर्व मनसे कार्यकत्र्याना परवानगी घेऊनच होर्डिग्ज लावण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे या प्रतिज्ञापत्रत नमूद करण्यात आले आह़े