विकत घेतलेला माल परत देता येतो
By admin | Published: August 5, 2014 01:35 AM2014-08-05T01:35:00+5:302014-08-05T11:51:57+5:30
महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पवई येथील दुकानदारास एका ग्राहकाकडून घेतलेले मालाचे सर्व पैसे एक हजार रुपये भरपाईसह परत करण्याचा आदेश दिला आहे.
Next
मुंबई : विकलेली वस्तू सदोष किंवा कमी प्रतीची असली तरी दुकानदाराने ती परत न घेणे किंवा बदलूनही न देणे बेकायदा आहे, असा निकाल देत महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पवई येथील दुकानदारास एका ग्राहकाकडून घेतलेले मालाचे सर्व पैसे एक हजार रुपये भरपाईसह परत करण्याचा आदेश दिला आहे.
मुंबई आयआयटीमध्ये नोकरी करणारे व तेथेच कॅम्पसमध्ये राहणारे प्रेम तुकाराम लोंके यांनी केलेले अपील मंजूर करून राज्य आयोगाचे अध्यक्ष न्या. आर. सी. चव्हाण व सदस्य धनराज खामतकर यांनी हा आदेश दिला. त्यानुसार पवई येथील महाराष्ट्र फॅमिली शोरूमचे मालक नरपत एस. पुरोहित यांनी लोंके यांना त्यांनी परत केलेल्या मालाची संपूर्ण रक्कम (रु. 3,क्5क्) व एक हजार रुपये भरपाई चार आठवडय़ांत द्यायची आहे. अन्यथा त्यावर 9 टक्के दराने व्याज लागू होईल.
लोंके यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र फॅमिली शोरूममधून दोन पँट व दोन शर्ट खरेदी केले होते. 1क् टक्के सूट वजा करून लोंके यांनी या कपडय़ांसाठी एकूण 3,क्5क् रुपये मोजले होते. लगेच दुस:या दिवशी लोंके कपडे बदलून घेण्यासाठी पुन्हा त्या दुकानात गेले. पण दुकानदाराने बदली म्हणून दाखविलेल्या कपडय़ांच्या दर्जाने समाधान न झाल्याने त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली; परंतु दुकानदार पुरोहित यांनी त्यास नकार दिला.
वकिलाची नोटीस देऊनही दुकानदार दाद देईना तेव्हा लोंके यांनी मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली; परंतु ‘एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही’, अशी अट दुकानदाराने बिलावरच छापलेली होती, यावर बोट ठेवून जिल्हा मंचाने तक्रार फेटाळली. राज्य आयोगाकडे अपील केल्यावर लोंके यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रलयाचे एक पत्र निदर्शनास आणले. ‘एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही किंवा बदलूनही दिला जाणार नाही’, अशी अट दुकानदारांनी त्यांच्या पावतीवर/बिलावर छापण्यास या पत्रन्वये मज्जाव करण्यात आला होता. राज्य आयोगाने लोंके यांच्या अपिलावर नोटीस काढताच दुकानदार पुरोहित वकिलासह हजर झाले व त्यांनी लोंके यांना सर्व पैसे परत करण्याची स्वत:हून तयारी दर्शविली. आयोगाने त्याखेरीज एक हजार रुपये भरपाई देण्याचाही आदेश दुकानदारास दिला. (प्रतिनिधी)
4एका महिला ग्राहकाने केलेल्या तक्रारीवर पुणो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने मे 2क्12 मध्येही असाच निकाल देत विकलेला माल परत न घेणो किंवा बदलून न देणो ही अनुचित व्यापार प्रथा असल्याचे नमूद केले होते.
4त्या महिलेने 24क् रुपयांना लेगिंग्ज खरेदी केल्या होत्या; परंतु त्या खूप घट्ट होतात म्हणून परत करायला गेल्यावर दुकानदाराने नकार दिला होता. त्या दुकानदारासही मालाचे पैसे परत करण्याखेरीज एक हजार रुपये भरपाई द्यावी लागली होती.
खर्च झाला, मात्र न्याय मिळाल्याचे समाधान
4आयोगाच्या निकालाने मला जेवढे पैसे मिळतील त्याहून माझा हे प्रकरण चालविण्यावर जास्त खर्च झाला. तरी न्याय मिळाल्याचे मला समाधान आहे. निदान या निमित्ताने इतर ग्राहक त्यांच्या हक्कांविषयी जागरूक होतील, हेही नसे थोडके, अशी प्रतिक्रिया तक्रारदार प्रेम लोंके यांनी दिली.