मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:25 AM2022-01-18T10:25:54+5:302022-01-18T10:27:32+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे रविवारी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

Can beat abuse Modi says Maharashtra Congress President Nana Patole | मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

Next

मुंबई/भंडारा : ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो,’ असे खळबळजनक वक्तव्य केलेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे रविवारी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
 
पटोले आपल्या मतदारसंघात  जेवनाळा येथे रविवारी मतदारांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले, मी का भांडतो. गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात आहे. लोक पाच वर्षांत आपल्या पिढीचा उद्धार करतात. शाळा-काॅलेज काढतात. मी एवढ्या वर्षाचा राजकारणात आहे. एक शाळा घेतली नाही. ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, मोदीला शिव्या देऊ शकतो. म्हणूनच मोदी माझ्या विरोधात प्रचारासाठी आले होते, असे पटोले म्हणताना व्हिडीओत दिसतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘मी आमच्याकडील गावगुंडाबाबत बोललो’  
जेवनाळा येथील सभेत काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरू नका. मी तुमच्यासोबत आहे. मोदीला मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे, असे नाना पटोले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  

फडणवीसांचा हल्लाबोल
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट  करीत, ‘नानाभाऊ! केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक बौद्धिक उंचीही असावी लागते’ असा टोला हाणला. पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांचा ताफा खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री साधी दखलसुद्धा घेत नाहीत आणि आता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो. काँग्रेसला आता राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरविणारे संघटन? असा सवालही फडणवीस यांनी केला.

Web Title: Can beat abuse Modi says Maharashtra Congress President Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.