शेतकरी सन्मान योजनेची पाच एकरची अट रद्द करू; मोदींचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 02:47 PM2019-04-22T14:47:04+5:302019-04-22T14:47:40+5:30
चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी आज मोदी यांनी नंदुरबारमध्ये सभा घेतली.
नंदुरबार : महाराष्ट्र व नंदुरबार शहीदांची भूमी आहे. परंतू शहीदांवरही काँग्रेस राजकारण करते. रेल्वे व महामार्गने राज्यातील दुर्गम भाग जोडला आहे. जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत आरक्षणाला हात लावणार नाही. आदिवासींच्या जमिनी सुरक्षित राहतील, असे आश्वासन मोदी यांनी नंदुरबारमध्ये दिले.
चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी आज मोदी यांनी नंदुरबारमध्ये सभा घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दोन महिन्यांपूर्वी नंदुरबारातील चौधरी चहाची आठवण काढली होती, आज पुन्हा ही आठवण ताजी झाली आहे. चाय वाल्याने कडकपणे देश चालविला यापुढेही चालविणार. ऊसापासून इथेनॉल तयार करण्याचे कारखाने सुरू करायचे आहेत. ऊसाला चांगला भाव मिळावा हा प्रयत्न, यामागे असल्याचे मोदी म्हणाले.
नियत साफ राहिली तर देशाच्या नितीला ही चांगल्या पध्दतीने राबविता येवू शकते. बांबू उत्पादनाला विशेष प्रोत्साहन देणार. शेतकरी सन्मान योजनेचा ऐतिहासिक निर्णय आहे. या योजनेची व्याप्ती वाढविणार असून 5 एकरची अटच रद्द करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
काँग्रेसने नंदुरबारातून आधार सुरू केले. परंतू आधारला निराधार केले. आधारला खरी ओळख मोदी सरकारने दिली. मजबूत सरकार, मजबूत पंतप्रधान पाहिजे असेल तर भाजपला मदत करा, चौकीदारला मजबूत करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.