यंदा तरी नव्या आश्रमशाळेत शिकायला मिळेल का?
By admin | Published: May 18, 2016 04:01 AM2016-05-18T04:01:56+5:302016-05-18T04:01:56+5:30
जव्हार प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या ३० आश्रमशाळांची अवस्था आजही बिकट
मोखाडा : जव्हार प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या ३० आश्रमशाळांची अवस्था आजही बिकट आहे. पडक्या भिंती गळक्या इमारती मोडकळीस आलेली शौचालये व न्हाणी घरे यामुळे ३० आश्रमशाळा पैकी गोंदे , हिरवे ,विनवळ, पाली, साक्री, दाभेरी, कावळे, सुर्यमाळ , पळसुंडा, गारगाव, गुहीर, अशा १३ आश्रमशाळांच्या नव्या इमारतींचे हाती घेण्यात आले यासाठी २०१० मध्ये निविदा काढण्यात आल्या परंतु कामाला सुरवात २०१३ मध्ये करण्यात आली. हे काम दोन वर्षात होणे आवश्यक होते, मात्र यापैकी एकाही इमारतीचे बांधकाम पूर्णपणे झालेल नाही कुठे बांधकाम तर कुठे वीजजोडणी बाकी आहे यामुळे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात तरी नव्या इमारतीत शिक्षण मिळेल असे वाटत होते.परंतु काम अपूर्ण असल्याने ते यावर्षीही शक्य होणार नाही. हे ही वर्षे कोंडवाडा असलेल्या आश्रमशाळेत जाणार म्हणून संताप व्यक्त केला जात असून सार्वजनिक बांधकाम विभागाची हलगर्जी व आदिवासी विभागाचे दुर्लक्ष यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. (वार्ताहर)
आदिवासी विभाच्या जव्हार प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या एकूण ३० आश्रमशाळा पैकी १३ आश्रमशाळाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते पण किरकोळ कामा अभावी गेली दोन वर्षे आदिवासी विकास विभागाच्या ताब्यात न दिल्याने गेले शैक्षणिक वर्ष मोडक्या पडक्या इमारतीत गेले. परंतु पुढच्या शैक्षणिक वर्षांत तरी या हक्काच्या इमारतीत शिक्षण मिळेल का? असा सवाल विचारला जात आहे.
नविन आश्रमशाळाचे बांधकाम सुरू असुन सात ते आठ आश्रमशाळा जून पर्यत पूर्ण होतील व आदिवासी विभागाच्या ताब्यात दिल्या जातील
डी. आर गुजर-
(सहाय्यक प्रकल्प शिक्षण विभाग )