‘कमाल खानला शोधूच शकलो नाही’
By admin | Published: November 18, 2015 02:16 AM2015-11-18T02:16:23+5:302015-11-18T02:16:23+5:30
हिट अॅण्ड रन केसप्रकरणी सलमान खानचा मित्र आणि गायक कमाल खान याला शोधू न शकल्याने सरकारी पक्षाकडून साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवू शकलो नाही, अशी माहिती मंगळवारी
मुंबई : हिट अॅण्ड रन केसप्रकरणी सलमान खानचा मित्र आणि गायक कमाल खान याला शोधू न शकल्याने सरकारी पक्षाकडून साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवू शकलो नाही, अशी माहिती मंगळवारी सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली.
‘आम्ही त्याचा (कमाल खान) ठावठिकाणी शोधू शकलो नाही,’
असे सरकारी वकील संदीप शिंदे
यांनी न्या. ए. आर. जोशी यांनी सांगितले. सोमवारी सलमानतर्फे
ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी कमाल खानला सरकारी वकिलांचा साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे, यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर अॅड. शिंदे यांनी वरील उत्तर दिले.
रोजनामाप्रमाणे कमाल खानने परदेशी जाण्याची परवानगी न्यायालयाकडून मागितली होती आणि त्याल ती देण्यात आली होती. त्यानंतर तो गायबच झाला.
सत्र न्यायालयात खटला सुरू झाला तेव्हा त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु यंत्रणा अपयशी ठरली, असे अॅड. शिंदे यांनी न्या. जोशी यांना सांगितले.
मंगळवारी सरकारी वकिलांनी अपिलावर युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. ‘कार अशोक सिंह नाही तर सलमान खानच चालवत होता.
अपघात घडल्यानंतर ही बाब
१३ वर्षांनी निदर्शनास आणण्यात आली. १३ वर्षांनंतर त्याने साक्ष
दिली. आपले नाव खराब
करणाऱ्या व्यक्तीला कोणी १३ वर्षे कामावर ठेवेल का? अपघाताच्या दिवशी सलमान ड्रायव्हिंग
सीटवर होता. तर त्याचा पोलीस बॉडीगार्ड रवींद्र पाटील त्याच्या
डाव्या बाजूला बसला होता. तर कमाल खान पाठच्या सीटवर बसला होता,’असा युक्तिवाद अॅड. शिंदे यांनी केला. बुधवारीही या अपिलावरील सुनावणी सुरूच राहणार आहे. (प्रतिनिधी)