कॅनडाच्या पंतप्रधानांचे भारतावर प्रेम - अमृता फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 06:12 AM2018-02-22T06:12:43+5:302018-02-22T06:12:51+5:30

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रिदेऊ, त्यांच्या पत्नी सोफी आणि त्यांच्या तिन्ही मुलांचेही भारतावर किती निस्सीम प्रेम आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना कालच्या भेटीत जाणवले.

Canada's Prime Minister's Love for India - Amrita Fadnavis | कॅनडाच्या पंतप्रधानांचे भारतावर प्रेम - अमृता फडणवीस

कॅनडाच्या पंतप्रधानांचे भारतावर प्रेम - अमृता फडणवीस

Next

मुंबई : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रिदेऊ, त्यांच्या पत्नी सोफी आणि त्यांच्या तिन्ही मुलांचेही भारतावर किती निस्सीम प्रेम आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना कालच्या भेटीत जाणवले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्रिदेऊ यांच्याशी मंगळवारी दुपारी चर्चा केली. त्यात प्रामुख्याने कॅनडा आणि महाराष्ट्रातील औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्याचा विषय होता. मात्र, या भेटीत त्रिदेऊ यांनी फडणवीस यांची जिव्हाळ्याने विचारपूस केली आणि आपल्यासारखे तरुण नेतृत्व महाराष्ट्राला प्रगतीकडेच नेईल, असा विश्वासही व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांशी स्रेहबंध निर्माण केले. या स्नेहबंधाचाच एक भाग म्हणून अमृता फडणवीस यांनी सायंकाळी ताज हॉटेलमध्ये जाऊन त्रिदेऊ, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हा अमृता यांनी दाखविलेल्या आदरातिथ्याची त्रिदेऊ दाम्पत्याने प्रशंसा केली. ‘भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे आम्हा दोघांनाही आकर्षण आहे. मी स्वत: रोज नियमित योगा करते आणि काही वर्षे मी योगा ट्रेनर म्हणूनही काम केले आहे. योगा भारताने जगाला दिलेली आरोग्याची अनमोल देणगी आहे, अशी भावना त्रिदेऊ यांच्या पत्नी सोफी यांनी व्यक्त केली.
यावेळी त्रिदेऊ, त्यांची पत्नी, मुलांनी आवर्जून भारतीय पेहराव केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आज दुपारी आपली अतिशय चांगली चर्चा झाली. आजच्या भेटीत आपण आज त्यांना कॅनडा भेटीचे आमंत्रण दिले आहे. कॅनडा आणि महाराष्ट्रातील
व्यापारी संबंध अधिक व्यापक करण्याचा आपलाही प्रयत्न असेल. असे त्रिदेऊ यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Web Title: Canada's Prime Minister's Love for India - Amrita Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.