भाजपाचे ‘कमळ’ चिन्ह रद्द करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका

By admin | Published: July 8, 2016 05:05 AM2016-07-08T05:05:19+5:302016-07-08T05:05:19+5:30

‘कमळ’ हे भारताचे राष्ट्रीय फूल असल्याने कोणत्याही राजकीय पक्षास त्याचा राजकीय लाभासाठी उपयोग करू दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला दिलेले ‘कमळ’ हे निवडणूक

Cancel BJP's 'lotus' mark; Petition in the Bombay High Court | भाजपाचे ‘कमळ’ चिन्ह रद्द करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका

भाजपाचे ‘कमळ’ चिन्ह रद्द करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Next

मुंबई : ‘कमळ’ हे भारताचे राष्ट्रीय फूल असल्याने कोणत्याही राजकीय पक्षास त्याचा राजकीय लाभासाठी उपयोग करू दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला दिलेले ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह रद्द केले जावे, अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका केली असून त्यात म्हटले आहे की, भाजपाला ‘कमळ’ या राष्ट्रीय
फुलाचा निवडणुकीसाठी वापर करू देणे हा १९५० च्या राष्ट्रीय चिन्हे अणि नावांच्या दुरुपयोग प्रतिबंधक कायद्याचा भंग आहे. त्यामुळे भाजपाला दिलेले ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह रद्द करण्याचा आदेश निवडणूक आयोगास द्यावा, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.
ही याचिका पुढील आठवड्यात प्राथमिक सुनावणीसाठी न्यायालयापुढे येण्याची अपेक्षा आहे. याचिकेतील मुद्द्यांचा विचार करून ‘कमळ’ निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्यासंबंधीचे सर्व
रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडून मागवून
घ्यावे व तसे करणे योग्य की अयोग्य याचा निकाल होईपर्यंत हे निवडणूक चिन्ह गोठविले जावे, अशीही मागणी याचिकेत केली गेली आहे. (विशेष प्रतिनिधी)

३० वर्षांपासून होतोय याच चिन्हाचा वापर
- कमळ हे शुचिता, सुयश, दीर्घायुष्य व भाग्यदायी मानले गेले असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीसाठी त्याचा वापर करू देणे गैर आहे.
शिवाय असे करणे उपर्युक्त कायद्यानुसार निषिद्ध असूनही कोणीही आक्षेप न घेतल्याने गेली २५ वर्षे भाजपाकडून ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह वापरले जात आहे, असे याचिका म्हणते.

कमळ हे पवित्र फूल असून प्राचीन भारतीय पुराणांमध्ये तसेच कलांमध्ये त्याचे एक आगळे स्थान आहे. कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. कमळ हे देवी लक्ष्मीचे फूल असून ते ऐश्वर्य, सुबत्ता व सुपीकतेचे प्रतीक मानले जाते.
- हेमंत पाटील,
सामाजिक कार्यकर्ते (याचिकाकर्ते)

Web Title: Cancel BJP's 'lotus' mark; Petition in the Bombay High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.