गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा
By admin | Published: May 20, 2015 01:09 AM2015-05-20T01:09:09+5:302015-05-20T01:09:09+5:30
गोवंशहत्या कायद्याने शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड बसणार असून, काही समाजांचे व्यवसाय बंद पडणार आहेत
पुणे : गोहत्या हा विषय अनेक हिंदू धर्मीयांच्या भावनेशी जोडला असल्याने आमचा विरोध नव्हता. परंतु, गोवंशहत्या कायद्याने शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड बसणार असून, काही समाजांचे व्यवसाय बंद पडणार आहेत. त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा हा विषय धार्मिक न करता रद्द करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (आठवले गट) मंगळवारी आंदोलन करण्यात आले. त्या वेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला.
गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळणे अडचणीचे ठरणार आहे. भाकड जनावरांची विक्री, चर्मोद्योगामध्ये काही समाजाचे उदरनिर्वाह आहेत. त्यामुळे गोवंश हत्याबंदी हा धार्मिक अंगाने भावनिक विषय न करता, कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणी रिपब्लिकचे अध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्या वेळी रिपब्लिकनचे नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे, बाळासाहेब जानराव, हनुमंत साठे, तसेच एमआयएमचे शहराध्यक्ष सर्फराज शेख व अंजुम इनामदार आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
अर्थसंकल्पात तरतूद नाही
४भाकड जनावरे सांभाळण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राज्य शासनाकडे नाही. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद नाही.
४ शेतकरी तोट्यातील शेती व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. गरीब व मागास जातीच्या नागरिकांना स्वस्त धान्य देणे शासनाला शक्य नाही.