-तर कामाचे कंत्राट रद्द करा!

By admin | Published: October 23, 2014 12:32 AM2014-10-23T00:32:20+5:302014-10-23T00:32:20+5:30

कविवर्य सुरेश भट सभागृह प्रकल्पाचे काम रखडले आहे. कंत्राटदार नियमानुसार बांधकाम करीत नसेल त्याचे कंत्राट रद्द करा, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिले.

-Cancel the work contract! | -तर कामाचे कंत्राट रद्द करा!

-तर कामाचे कंत्राट रद्द करा!

Next

रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा : महापौरांचे निर्देश
नागपूर : कविवर्य सुरेश भट सभागृह प्रकल्पाचे काम रखडले आहे. कंत्राटदार नियमानुसार बांधकाम करीत नसेल त्याचे कंत्राट रद्द करा, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिले.
जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत शहरात विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील काही प्रकल्प पूर्णत्वास गेले असून काही प्रलंबित आहेत. अशा प्रकल्पांचा दटके यांनी आढावा घेतला. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकु लवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्याम वर्धने, स्थापत्य विद्युत व प्रकल्प समितीचे सभापती संदीप जोशी, आरोग्य समितीचे सभापती रमेश शिंगारे, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, शहर अभियंता संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, अजीर्जूर रहेमान यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सुरेश भट सभागृह, शुक्रवारी येथील नागनदीवरील पूल,नवीन प्रशासकीय इमारत, सिमेंट रोड, दानागंज शॉपिंग मॉल, विवेकानंदनगर येथील इनडोअर स्टेडियम, नद्या व सरोवरे प्रकल्प , एलईडी पथदिवे, सोलर वॉटर हिटर, रामझुला व पेंच प्रकल्प,२४ बाय ७ पाणी पुरवठा योजना आदी विकास कामांचा आढावा दटके यांनी घेतला. सुरेश भट सभागृहाचे काम का रखडले, असा असा सवाल दटके यांनी अधिकाऱ्यांना केला. स्थायी समिती सभापती व स्थापत्य समिती सभापती यांनी बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याची सूचना दटके यांनी केली.
जुनी शुक्रवारी येथील नागनदीवरील पुलाचे काम डिसेंबर २०१४ पर्यत पूर्ण होईल,अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक मजल्याचे काम पूर्ण करावे. कामे निर्धारित कालावधीत पूर्ण होण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दहा दिवसात सादर करण्याचे निर्देश दटके यांनी दिले.(प्रतिनिधी)

Web Title: -Cancel the work contract!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.