महाजनादेश यात्रेच्या अखेरच्या दिवसाचे कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 03:04 AM2019-08-09T03:04:34+5:302019-08-09T03:04:47+5:30
ख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्त सांगली, कोल्हापूरकडे धाव घेतली असून त्यांनी स्वत: मदतकार्यात पुढाकार घेतला
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवसाचे उद्या शुक्रवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्त सांगली, कोल्हापूरकडे धाव घेतली असून त्यांनी स्वत: मदतकार्यात पुढाकार घेतला असल्याने महाजनादेश यात्रेचे शुक्रवारचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे यात्रा प्रमुख भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.
नियोजनानुसार यात्रेचा पहिला टप्पा शुक्रवार ९ आॅगस्ट रोजी संपणार होता. पण पूरस्थिती ध्यानात घेऊन मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारीच मुख्यमंत्र्यांनी अकोला येथून महाजनादेश यात्रेतून मुंबईकडे प्रयाण केल्याचे त्यांनी सांगितले.