टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 02:31 PM2024-10-14T14:31:19+5:302024-10-14T15:03:17+5:30

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रशासनाकडून एसटीच्या प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Cancellation of seasonal fares of ST buses Decision of Maharashtra State Road Transport Corporation | टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा

ST Bus : दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीसाठी प्रवास भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. शिवनेरी वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेसाठी २५ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू करण्यात आली होती. ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार असल्याने प्रवाशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ही भाडेवाढ रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एसटी प्रशासनाने प्रवास भाड्यात १० टक्के वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दिवाळी सण काही दिवसांवर आलेला असतानाच एसटी प्रशासनाकडून एसटीच्या प्रवास भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीनिमित्ताने गावी जाणाऱ्या किंवा फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणाच्या शक्यता होती. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाची हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक सुरु असते. त्याचा सर्वाधिक फायदा हा एसटी प्रशासनाला होतो. कारणी खासगी वाहतूकीचे दर हे सर्वसामान्यांना परवडवणारे नसतात. त्यामुळे प्रवासी एसटीचा पर्याय स्विकारतात. मात्र एसटी प्रवाशाने दिवाळी दरम्यान, १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र  यावेळी एसटी प्रशासनाने या निर्यणाला स्थगिती दिली आहे. एसटी प्रशासनाने यासंदर्भातील परिपत्रक देखील काढलं होतं. मात्र ही हंगामी भाडेवाढ करण्याच्या निर्णय एसटी महामंडळाने रद्द केला आहे.

दरम्यान, साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी या बसमध्ये ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. सहा किलोमीटरच्या एका टप्प्यासाठी साध्या बसचे भाडे ८.७० रुपये आहे. त्यात दहा टक्के वाढ झाल्यानंतर ९.५५ रुपये म्हणजे एकूण दहा रुपये एका टप्प्यासाठी मोजावे लागणार होते. गेल्या वर्षी देखील एसटी महामंडळाकडून दिवाळी हंगाम काळासाठी तिकीट दरात सर्वच मार्गांतील गाडीवर १० टक्के वाढ केली होती. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या प्रवासासाठी सुमारे ५० रुपये, तर १०० ते १५० रुपये लांबपल्ल्याच्या गाड्यांना जादा भाडे द्यावे लागले होते.
 

Web Title: Cancellation of seasonal fares of ST buses Decision of Maharashtra State Road Transport Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.