३० सेकंदांत होणार कर्करोगाचे निदान!

By Admin | Published: October 11, 2015 02:10 AM2015-10-11T02:10:18+5:302015-10-11T02:10:18+5:30

शरीरात गाठ आल्यावर कर्करोगाची गाठ असेल का? अशी शंका उपस्थित होते. मग, कर्करोगाचे निदान करण्यासाठी तपासण्या कराव्या लागतात. पण, यापुढे ट्युमर संदर्भातील

Cancer diagnosis in 30 seconds! | ३० सेकंदांत होणार कर्करोगाचे निदान!

३० सेकंदांत होणार कर्करोगाचे निदान!

googlenewsNext

मुंबई : शरीरात गाठ आल्यावर कर्करोगाची गाठ असेल का? अशी शंका उपस्थित होते. मग, कर्करोगाचे निदान करण्यासाठी तपासण्या कराव्या लागतात. पण, यापुढे ट्युमर संदर्भातील विशिष्ट माहिती ‘ट्युमर, नॉड अ‍ॅण्ड मेटासॅटिस’(टीएनएम) अप्लिकेशनमध्ये भरल्यास ३० सेकंदांत कर्करोग कोणत्या स्थितीत आहे, याचे निदान होणार आहे.
टाटा मेमोरियलच्या डॉक्टरांनी टीएनएम अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. डॉक्टर हे अ‍ॅप्लिकेशन मोफत डाऊनलोड करू शकतात. डॉक्टरांनी अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर ते आॅफलाइनही वापरू शकतात. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये गरज असलेली माहिती भरल्यावर अवघ्या ३० सेकंदांमध्ये कर्करोग कोणत्या स्थितीत आहे, याचे निदान होते. जगभरातील डॉक्टर हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात. अ‍ॅप्लिकेशन सध्या प्राथमिक पातळीवर आहे. या वेळी त्यातील काही पर्याय हे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना उपयुक्त आहेत. त्यांना या अ‍ॅप्लिकेशनमधून माहिती मिळू शकते. पुढच्या टप्प्यात त्यात अजून काही पर्याय उपलब्ध होणार आहेत. हे डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांना उपयुक्त ठरणार आहेत. त्यांना मार्गदर्शन मिळेल, असे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Cancer diagnosis in 30 seconds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.