कर्करोग हा अंत नाही, इच्छाशक्तीने करा मात - इमरान हाशमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2017 09:19 PM2017-04-26T21:19:53+5:302017-04-26T21:19:53+5:30

इमरान हाशमी याचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ती बिनधास्त, बोल्ड आणि पडद्यावरील किसिंग किंग ची प्रतिमा. मात्र या बेधडक कलाकारामागे

Cancer is not an end, do it with curiosity - Imran Hashmi | कर्करोग हा अंत नाही, इच्छाशक्तीने करा मात - इमरान हाशमी

कर्करोग हा अंत नाही, इच्छाशक्तीने करा मात - इमरान हाशमी

Next

 ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 26 -  एरवी चित्रपट कलाकार इमरान हाशमी याचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ती बिनधास्त, बोल्ड आणि पडद्यावरील  किसिंग किंग ची प्रतिमा. मात्र या बेधडक कलाकारामागे एक हळवा, अभ्यासू, सामाजिक जाणीव असलेला व कर्करोगासारख्या रोगावर मात करणाऱ्या लढवय्या मुलाचा कणखर बाप लपला आहे, याची बहुतांश लोकांना जाणीवदेखील नाही.  लोकमत  व  कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल च्या संयुक्त विद्यमाने आयोजित  एक जीवन, स्वस्थ जीवन या उपक्रमांतर्गात आयोजित परिसंवादादरम्यान इमरानच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू समोर आले.
इमरान हाशमीचा मुलगा अयान याला वयाच्या चौथ्या वर्षी कर्करोग झाला होता. इतक्या लहान वयात पोटच्या मुलाला झालेला हा आजार पाहून हाशमी दाम्पत्य हादरून गेले होते. मात्र त्यांनी स्वत:ला सावरले व मुलाला या जीवघेण्या आजाराच्या जबड्यातून बाहेर काढून आणले. या प्रवासातून एक गोष्ट निश्चित कळली. कर्करोग हा अंत नाही तर इच्छाशक्तीने त्यावर मात करता येऊ शकते, अशा भावना यावेळी झालेल्या मुलाखतीत इमरानने व्यक्त केल्या. श्वेता शेलगावकर यांनी त्याची मुलाखत घेतली.

समुपदेशन अत्यावश्यक
अयानला कर्करोग झाल्याचे जगाला का सांगतो, असे माझ्या कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र जागृती निर्माण करणे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटले. रुग्णांवर वैद्यकीय उपचार जितके आवश्यक आहे, तितकेच किंवा त्याहून जास्त समुपदेशन अत्यावश्यक आहे. कुटुंबीयांनी दिलेला आधारदेखील महत्त्वपूर्ण ठरतो. अयानवर उपचार करण्याच्या वेळी कधी ह्यआयरन मॅनह्ण बनवत असल्याचे सांगितले तर कधी शरीरातील राक्षस बाहेर काढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले होते. रुग्णांशी संवाद साधणे गरजेचे असते. कर्करोगाबाबत अनेक जण बाहेर वाच्यता करण्याचे टाळतात. ही मानसिकता बदलल्या गेली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन इमरान हाशमीने केले.

 लोकमतच्या पुढाकाराचे कौतुक

कर्करोगासंदर्भातील जनजागृतीसंदर्भात ह्यलोकमतह्णने आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. कर्करोगाबाबतची माहिती, कारणे, उपचार यांची माहिती जनतेपर्यंत गेलीच पाहिजे. अशाप्रकारच्या उपक्रमांची समाजाला आवश्यकता आहे, असे कौतुकोद्गार यावेळी इमरानने काढले.

आजार व्यवस्थापनाचे शिक्षण का नाही?
कर्करोगावर जनजागृती करण्यासाठी विधायक पुढाकार घ्यायला हवा. विशेषत: नवीन पिढी व शालेय विद्यार्थ्यांना याची माहिती दिली गेली पाहिजे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित यांचा अनेकांना आयुष्यात फारसा उपयोग होत नाही. पण तरीही ते विषय शिकविले जातात. आरोग्य तर प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याची बाब आहे. मग मुलांना जास्तीत जास्त जबाबदार बनविण्यासाठी आजार  व्यवस्थापनासारखे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट का करण्यात येत नाही, असा प्रश्न इमरानने उपस्थित केला. सार्वजनिक आरोग्यसुविधांवर आपल्या देशात चीन व अमेरिकेच्या तुलनेत फार कमी तरतूद असल्याकडेदेखील त्याने लक्ष वेधले.

Web Title: Cancer is not an end, do it with curiosity - Imran Hashmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.