राज्यातील कर्करोग्यांचीही ठेवणार नोंद

By admin | Published: August 10, 2015 12:39 AM2015-08-10T00:39:20+5:302015-08-10T00:39:20+5:30

स्वाइन फ्लू, क्षयरोग झालेल्या प्रत्येक रुग्णाची दखल (नोटीफाय) केंद्र व राज्य सरकारकडून घेतली जाते. या रुग्णांची माहिती सरकारकडे असते. त्याचप्रमाणे लवकरच कर्करोग

Cancer will also be kept in the state | राज्यातील कर्करोग्यांचीही ठेवणार नोंद

राज्यातील कर्करोग्यांचीही ठेवणार नोंद

Next

पुणे : स्वाइन फ्लू, क्षयरोग झालेल्या प्रत्येक रुग्णाची दखल (नोटीफाय) केंद्र व राज्य सरकारकडून घेतली जाते. या रुग्णांची माहिती सरकारकडे असते. त्याचप्रमाणे लवकरच कर्करोग झालेल्या रुग्णांचीही सरकारकडून दखल घेतली जाणार असून त्यांची नोंद केली जाईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी रविवारी येथे दिली.
इंडियन कॅन्सर सोसायटी आणि असोसिएशन आॅफ महाराष्ट्र मेडिकल आॅन्कोलॉजिस्ट्सतर्फे (एएमएमओ) आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी इंडियन सोसायटी आॅफ मेडिकल अ‍ॅन्ड पिडिअ‍ॅट्रीक आॅन्कॉलॉजी आणि एएमएमओचे उपाध्यक्ष डॉ. अनंतभूषण रानडे, एएमएमओचे अध्यक्ष डॉ. बी. व्ही. औसेकर, सचिव डॉ. शैलेश बोंदर्डे, इंडियन कॅन्सर सोसायटीचे महासंचालक डॉ. प्रदीप गोगटे, डॉ. पद्मज कुलकर्णी आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘कर्करोगाबाबत जनजागृती वाढविण्याच्या गरज आहे. त्याचप्रमाणे कर्करोगावर कमीत कमी खर्चात उपचार होणे अपेक्षित आहे. याचा विचार करून राज्यात कर्करोगाला लवकरच नोटीफाय केले जाणार आहे. सध्या कर्करोगाबाबत संकेतस्थळावर खूप माहिती मिळते.

Web Title: Cancer will also be kept in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.