आधारकार्डशिवाय परीक्षा अर्ज भरता येणार

By admin | Published: October 17, 2016 12:57 AM2016-10-17T00:57:41+5:302016-10-17T00:57:41+5:30

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करताना आधारकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला होता.

Candidates can fill the examination form without Aadhaar card | आधारकार्डशिवाय परीक्षा अर्ज भरता येणार

आधारकार्डशिवाय परीक्षा अर्ज भरता येणार

Next


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करताना आधारकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला होता. मात्र त्यास विरोध होऊ लागल्याने आधारकार्ड नसेल, तर आधारकार्डसाठी अर्ज केलेला नोंदणी क्रमांकही स्वीकारला जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजूनही आधारकार्ड न काढलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना आधारकार्ड बंधनकारक केले होते. परंतु, आधारकार्ड सक्तीस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विरोध केला. तसेच मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव व विक्रांत अमराळे यांनी आधारकार्ड सक्ती रद्द करावी, अशी मागणी राज्य मंडळाकडे केली. त्यावर मंडळातर्फे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
>परीक्षा अर्ज भरताना आधारकार्ड अनिवार्य केले असले तरी एखाद्या विद्यार्थ्याकडे आधारकार्ड नसेल, तर आधार नोंदणी क्रमांक परीक्षेसाठी ग्राह्य धरला जाईल.
आधारकार्डसाठी अद्याप नोंदणी केलेली नसेल तर निकालापर्यंत आधारकार्ड काढण्यात येईल, असे संबंधित विद्यार्थ्यांनी प्राचार्य अथवा मुख्याध्यापकांकडे लेखी देणे आवश्यक आहे.
आधारकार्र्ड नसले तरीही परीक्षा अर्ज भरता येणार आहे, असे राज्य मंडळाच्या परिपत्रकात नमूद करण्यात
आले आहे.

Web Title: Candidates can fill the examination form without Aadhaar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.