मुलुंडच्या मतमोजणी केंद्रात उमेदवारांचा गोंधळ
By admin | Published: February 23, 2017 10:15 AM2017-02-23T10:15:54+5:302017-02-23T10:15:54+5:30
मतमोजणीसाठी मुलुंड येथील मतदान केंद्रात जमलेल्या उमेदवारांनी गोंधळ घातला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी होत आहे. गुरुवारी सकाळी मतमोजणीसाठी मुलुंड येथील मतदान केंद्रात जमलेल्या उमेदवारांनी गोंधळ घातला.
उमेदवारांच्या आसन व्यवस्थेसह शौचालयाची गैरसोय असल्याने उमेदवारांनी गोंधळ घातला. भाजपाचे नगरसेवक सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधारे, नगरसेविका सुजाता पाठक , अनीषा माजगवकरसह १० ते १२ कार्यकार्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत घातली.त्यांना मतमोजणी केंद्रात जागा नसल्याने त्यांना बाहेर थांबण्याचा सल्ला दिला. मतमोजणी केंद्रांसाठी लागणारी सर्व व्यवस्था तसेच अधिकारी, कर्मचारी वर्ग यापूर्वीच नियुक्त करण्यात आला आहे. मुंबईत 23 केंद्रांवर मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीसाठी ९६६ कर्मचारी लागणार असून २३ निवडणूक निर्णय अधिकारी व २३ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच यासंबंधीची सांख्यिकी माहिती संकलित करण्यासाठी साधारणत: १३८ कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.