उमेदवारांनो, विजय असू द्या फटाकेमुक्त!
By admin | Published: October 17, 2014 01:50 AM2014-10-17T01:50:59+5:302014-10-17T01:50:59+5:30
तीनच दिवसांत मतदानयंत्रे बोलू लागतील आणि जय-पराजय निश्चित होईल. त्यामुळे दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होण्याची शक्यता सर्वानीच गृहीत धरली आहे.
Next
सातारा : तीनच दिवसांत मतदानयंत्रे बोलू लागतील आणि जय-पराजय निश्चित होईल. त्यामुळे दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होण्याची शक्यता सर्वानीच गृहीत धरली आहे. मात्र, निवडणुकीतील विजय फटाकेमुक्त करून पर्यावरण संतुलनात वाटा उचलून आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याचे संकेत द्यावेत, असे आवाहन उमेदवारांना अंधश्रद्धा निमरूलन समिती (अंनिस)करणार आह़े
रविवारी मतमोजणीचा दिवस आहे. दिवाळीही तोंडावर आहे. परंतु निवडणुकीत विजय निश्चित होण्यापूर्वीच प्रचारातील पदयात्रंपासून सर्वत्र फटाके फोडले गेल्याचे जिल्ह्यातील नागरिकांनी पाहिले आहे. ज्या भागातून नेत्याची पदयात्र जाणार असेल, तेथील कार्यकर्ते फटाक्यांची सर रस्त्यावर पसरूनच नेत्याची वाट पाहत असत. निवडणुकीपूर्वी इतके फटाके फुटले, तर निकालानंतर किती फुटतील, याचा अंदाजच न केलेला बरा! या पाश्र्वभूमीवर, प्रदूषणमुक्तीचा हेतू मनात ठेवून विजयी उमेदवारांनी आपल्या कार्यकत्र्याना आधीच आवाहन करावे आणि फटाके फोडण्यापासून परावृत्त करावे, अशी ‘अंनिस’ची भूमिका आहे. येत्या दोन दिवसांत सर्व प्रमुख उमेदवारांना भेटून ही भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
बालगोपाळांना आवाहन
‘अंनिस’तर्फे दरवर्षी विविध शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन करणारे पत्रक वाटले जाते. या वर्षी फटाकेमुक्तीचे आवाहन करणारे संदेश शाज्ञ जयंत नारळीकर, अभिनेता नाना पाटेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश आमटे, डॉ. नरेंद्र जाधव यांनी या पत्रकावर केले आहे. या पत्रकाच्या तळाशी एक स्लिप असेल. ‘मी आतार्पयत किती रुपयांचे फटाके फोडत होतो आणि या वर्षी त्यात किती कपात करेन,’ याबाबतचे हे प्रतिज्ञापत्र असेल. पालकांशी बोलून विद्याथ्र्यानी ते भरायचे आहे. गेल्या वर्षी या उपक्रमातून 12 ते 15 कोटींची बचत झाल्याचे स्पष्ट झाले होते. या वर्षी अशी दोन लाख पत्रके काढण्यात आली असून, ती वाटण्यास प्रारंभ झाला आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशेषत: व्यापारीवर्गाकडून मोठय़ा प्रमाणावर फटाके फोडले जातात. लक्ष्मीपूजनापूर्वी अंधश्रद्धा निमरूलन समितीचे पुण्यातील कार्यकर्ते दरवर्षी लक्ष्मी रस्त्यावरून रॅली काढतात आणि कमीतकमी फटाके फोडण्याचे आवाहन करतात. याच धर्तीवर साता:यातही रॅली काढण्याचा प्रयत्न सातारा शाखेकडून सुरू आहे.
- डॉ. हमीद दाभोलकर