आॅनलाइनचा फटका उमेदवारांना

By admin | Published: February 6, 2017 06:14 AM2017-02-06T06:14:46+5:302017-02-06T06:14:46+5:30

महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोय राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली होती

The candidates of the online game | आॅनलाइनचा फटका उमेदवारांना

आॅनलाइनचा फटका उमेदवारांना

Next

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोय राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली होती. मात्र, आॅनलाइन अर्जांमुळे उमेदवारांची तारांबळ उडाली होती. अनेकांना आॅनलाइनचा फटका बसला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच आॅनलाईन अर्ज भरण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यानुसार आयोगाने राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन याबाबत प्रबोधनही केले होते. प्रात्यक्षिकही दाखविले होते. निवडणुकीसाठी एकुण ५४०६ जणांनी संकेतस्थळावर अर्ज लॉग आॅन केले होते. त्यापैकी एकूण २३८८ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सादर केले होते.
एकुण ३२ प्रभागांसाठी छाननी झाली. त्यात १४३ अर्ज बाद झाले. महापालिकेच्या एकूण ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात छाननीचे कामकाज सुरू होते. छाननीत अनेक अर्ज बाद करण्यात आले. उमेदवारी अर्ज बाद होण्याची अनेक कारणे आहेत. त्यात एकापेक्षा अधिक अपत्य असणे, एकाच प्रभागात दोन नामनिर्देशनपत्र भरणे, सूचक आणि अनुमोदक प्रभागातील मतदार नसणे, जातीची मूळ कागदपत्रे सादर न करणे, शौचालय प्रमाणपत्र सादर न करणे, एकाच प्रभागात दोन जागा अर्ज सादर केल्याने उमेदवार संमतीनुसार, अनुमोदनकर्त्याची दुबार
स्वाक्षरी, एकाच सूचकाने प्रस्तावित केलेला दुसरा अर्ज, अनुमोदकाची स्वाक्षरी नसणे, मतदारयादीतील दाखला सादर न केल्याने, दोनपेक्षा अधिक अपत्य असणे, मतदार यादीची प्रमाणित प्रत सादर न करणे, अर्जदाराची तिसऱ्या ठिकाणावर स्वाक्षरी नसणे, शपथपथावर उमेदवाराची स्वाक्षरी नसणे, भाग दोन घोषणापत्र नामनिर्देशनपत्रात समाविष्ट नसणे, अर्जदाराची तीन ठिकाणी स्वाक्षरी नसणे, प्रस्तावक आणि अनुमोदक दुबार असणे, इच्छापत्र दिल्याने, उमेदवार अनुमोदक आणि प्रस्तावकाची अर्जावर स्वाक्षरी नसणे, जात
दाखला आणि वैधता प्रमाणपत्र नसणे, शपथपत्र साक्षांकित नसणे, प्रस्तावक आणि अनुमोदक यांची स्वाक्षरी, अनुमोदक सही नसणे, सूचक आणि अनुमोदक प्रभागातील मतदार नसणे, प्रभाग क्रमांकात खाडाखोड करणे, उमेदवार पालिका क्षेत्रातील मतदार नसणे, जात प्रमाणपत्र नसणे आदी कारणांमुळे अर्ज बाद ठरविले आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज उमेदवाराने अनेक जागांवर नामनिर्देशनपत्र सादर केल्याने बाद झाले आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: The candidates of the online game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.