‘जलमित्र’ अभियानास ‘कॅनन’ची साथ!

By admin | Published: May 18, 2016 02:24 AM2016-05-18T02:24:17+5:302016-05-18T02:24:17+5:30

‘जलमित्र’ अभियानात दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पावभाजी सेंटर ‘कॅनन’ने साथ दिली आहे

Canon's 'Jalmitra' campaign! | ‘जलमित्र’ अभियानास ‘कॅनन’ची साथ!

‘जलमित्र’ अभियानास ‘कॅनन’ची साथ!

Next


मुंबई : ‘लोकमत’ने पाणीबचतीसाठी राज्यभर सुरू केलेल्या ‘जलमित्र’ अभियानात दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पावभाजी सेंटर ‘कॅनन’ने साथ दिली आहे. दररोज हजारो खवय्ये येणाऱ्या ‘कॅनन’ने ‘लोकमत-जलमित्र’ अभियानांतर्गत पाणी वाचवण्याची मोहीम सुरू केली आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे बहुतेक प्रवासी ‘कॅनन’चा स्टॉप घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. पावभाजी, वडापाव अशा नानाविध पदार्थांची चव चाखल्यानंतर घाईघाईतच खवय्ये जमेल तितके पाणी पिऊन पुढील कामासाठी धाव घेतात. या गडबडीत बहुतेक खवय्ये अर्धाच ग्लास पाणी पित असल्याचे ‘लोकमत’च्या निदर्शनास आले होते. उरलेल्या अर्धा ग्लास पाण्याची माहिती घेतली असता, हे पाणी वॉश बेसिनमध्ये ओतत असल्याचे समजले. त्यामुळे हजारो लीटर पाणी रोज वॉश बेसिनमधून नाल्यामध्ये जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, ‘लोकमत’ने कॅननचे चालक अप्पा दांडेकर यांची भेट घेत, जलमित्र अभियानाबाबत माहिती दिली. अप्पांनीही या अभियानात सामील होण्यास होकार दर्शविला. प्रत्येक खवय्याला पाण्याचे महत्त्व पटावे, म्हणून कॅननच्या कट्ट्यावर पाणीबचतीचे संदेश देणारे टेंटकार्ड ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, कॅननसमोर पाणीबचतीसाठी ड्रम ठेवण्यात आला आहे. या ड्रममध्ये खवय्यांच्या ग्लासमध्ये उरलेले पाणी साठवण्यात येईल. शिवाय, या पाण्याचा पुनर्वापर जास्त खराब झालेली भांडी प्राथमिक स्वरूपात साफ करण्यासाठी होईल. त्यानंतर, स्वच्छ पाण्याने भांडी पुन्हा साफ करता येतील. त्यामुळे भांडी घासण्यासाठी कमीत कमी स्वच्छ पाणी लागेल, शिवाय वाया जाणाऱ्या पाण्याचाही पुनर्वापर होईल.

Web Title: Canon's 'Jalmitra' campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.